मुक्तपीठ टीम
दो आंखें बारह हाथ पाहिला आहे तुम्ही? वी शांताराम यांच्या अजरामर चित्रपटामुळे कैद्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बराचसा बदलला होता. आता गुजरात सरकारनेही कैद्यांच्या पुनर्वसनासाठी विचार केला आहे. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी एक वेगळे ‘गुजरात मॉडेल’ तयार करण्यात आलं आहे.
शिक्षा संपल्यानंतर कैद्यांना स्वत:ला सुधारण्याची संधी देण्यासाठी गुजरात सरकारचा कारागृह विभाग प्रयत्न करीत आहे. गुजरातमधील कैंद्यांमध्ये आवश्यक कौशल्य आणि इतर प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. जेल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच सीएसआरअंतर्गत, आठ कंपन्यांनी कैद्यांची पात्र तपासून काम देण्यास रस दर्शविला आहे. गेल्या वर्षभरात राज्यभरातील सर्व २९ तुरूंगातून सुटलेल्या सुमारे २६० कैद्यांची माहिती सरकारकडे आहे.
राज्यभरात सुमारे १५,००० कैदी तुरुंगात आहेत. यापैकी सुमारे ९,५०० कच्चे कैदी आहेत. अतिरिक्त डीजीपी केएल एन राव यांच्या माहितीनुसार, ही योजना केवळ दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळासाठी तुरुंगवास भोगलेल्या दोषींसाठी आहे. ज्या कैद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांचा या योजनेत समावेश नाही. त्यांनी २०२१ मध्ये सोडण्यात येणाऱ्या कैद्यांची यादी तयार केली आहे.
एक्सचेंजच्या माध्यमातून किती कैद्यांनी नोकरी स्वीकारली याचाही अधूनमधून आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राव यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, “पीईई योजनेशिवाय ते लवकरच सुटणार असलेल्या दोषींच्या वार्षिक कॅम्पस इंटरव्ह्यूची योजना आखत आहेत.”
कारागृह अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यात चार खुली कारागृह आहेत: अहमदाबाद, वडोदरा, जुनागड आणि अमरेली. “सुरत आणि राजकोट येथे आणखी दोन खुले कारागृह उघडण्याची सरकारची योजना आहे. तेथे दोषी कैद्यांची संख्या अधिक आहे. चांगल्या सवयी असलेल्या दोषी कैद्यांनाच खुल्या तुरूंगात ठेवण्याची परवानगी आहे. तेथे त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना मोबदला देण्यात येतो.”
पाहा व्हिडीओ: