मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीच्या काळातही देशातील टॉप ५०० कंपन्यांचे भांडवल ६८ टक्क्यांनी वाढले आहे. हुरुनने जाहीर केलेल्या यादीत सांगितले की, शेअर बाजारात सूचीबद्ध टॉप-५०० कंपन्यांच्या भांडवलात २०२०-२१ मध्ये ९० लाख कोटी रुपयांची वाढ झाली आणि एकूण संपत्ती २२८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. हुरुनच्या मते, २०० कंपन्यांचे बाजारमूल्य मागील वर्षात दुप्पट झाले आहे.
मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही १६.७ लाख कोटींसह देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दुसऱ्या क्रमांकावर आणि एचडीएफसी बँक तिसऱ्या स्थानावर आहे. सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटचे मूल्यांकन १२७ टक्क्यांनी वाढून १.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
२०२१ मध्ये, या कंपन्यांनी एकूण ५८ लाख कोटींची विक्री केली, जी भारतीय जीडीपीच्या २६ टक्के आहे. एवढेच नाही तर, या कंपन्यांनी एकूण ६९ लाख लोकांना रोजगार दिला आहे, जे देशाच्या एकूण श्रमशक्तीच्या १.५ टक्के आहे. वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये स्टार्टअप्सचा वाटा ११ टक्के आहे.
टाटा समूहाने ८.५ लाख कोटींची भर घातली
- २०२१ मध्ये, टाटा समूहाने आपल्या मालमत्तेत सर्वाधिक वाढ केली आहे.
- १४ समूह कंपन्यांनी एकूण ८.५ लाख कोटी रुपयांचे भांडवल जोडले आहे, जे एकूण कंपन्यांच्या कमाईच्या सुमारे १०% आहे. ३. या यादीत समाविष्ट कंपन्यांनी १.९ लाख कोटी रुपयांचा कर भरला आहे, जो एकूण कॉर्पोरेट कराच्या ६२ टक्के आहे.
कंपन्यांची कमावतात
- आरआयएल- ३,६३,०४४
- टीसीएस- ३,०९,५३४
- इंफोसिस- २,९९,९४६
- आयसीआयसीआय- २,६७,०२२
- एचडीएफसी- २,५४,३०३
सर्वात प्रभावी क्षेत्र
- वित्त ७७ कंपन्या
- आरोग्य ६४ कंपन्या
- केमिकल्स ४२ कंपन्या
- सॉफ्टवेअर ३७ कंपन्या
- ग्राहक उत्पादने ३५ कंपन्या आहेत.