मुक्तपीठ टीम
ही एक चांगली बातमी आहे. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात हे घडले आहे. सेवानिवृत्त प्राचार्य बृजमोहन मीना यांनी टोंक जिल्ह्यातील खेड्यातील मुलीशी त्यांच्या मुलाचे लग्न ठरविले आहे. त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु होता. त्यांच्या साखरपुड्याच्या काही रीती सुरू असताना मुलीच्या वडिलांनी नोटांनी भरलेले ताट बृजमोहन मीणा यांना दिले. हे पाहून ते म्हणाले की, हे पैसे आम्हाला नको आहेत. आम्हाला फक्त तुमची मुलगी हवी आहे. असे हुंडा म्हणून ११ लाख रुपये परत केले. आणि परंपरा राखण्यासाठी फक्त १०१ रुपये स्वीकारले.
बृजमोहन मीणा खजुरी पंचायतीच्या पिपरवाला गावात राहतात. मुलगा रामधनच्या साखरपुड्यानिमित्त उनियारा तहसीलमधील सोलतपुरा गावात पोहोचले होते. वधूच्या बाजूने त्यांना ११ लाख १०१ रुपये दिले गेले. बृजमोहन मीणा यांनी या रकमेतून फक्त १०१ रुपयांची भेट घेतली आणि ११ लाख रुपये घेण्यास नकार दिला. कार्यक्रमास उपस्थित लोकांनी त्यांचे कौतुक केले आणि सर्वांनी त्यापासून शिकण्याचे आवाहन केले.
आरती मीणा असे वधूचे नाव आहे. तिच्या सासरच्या निर्णयामुळे ती खूप आनंदित आहे. हुंड्याची रक्कम परत करून त्यांनी समाजाला निरोप पाठविला असल्याचे आरती यांनी सांगितले. यामुळे मुलींचा सन्मान वाढेल. आरतीने बी.एससी केले आहे, आता ती बीएड करत आहे.
बृजमोहन मीना यांचे हुंड्याचे पैसे परत करणे हे अनेकांसाठी मोठी प्रेरणा आहे. टोंक, बुंदी, सवाई मधूपूर जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे. त्यांनी समाजाला नवी प्रेरणा दिली.
पाहा व्हिडीओ: