मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात सर्व भेद बाजूला पडले आणि माणुसकीची भावना प्रभावी ठरली. सोलापूरातही समाजातील गरजूंसाठी मदतीचा हात देणाऱ्या चांगल्या माणसं आणि संस्थांमध्ये काही तरुण सातत्यानं सक्रिय आहेत. हे तरुण आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मनसैनिक. त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केवळ सोलापूरात नाही तर कर्नाटकातील गुलबर्गातही होत आहे. कारण त्यांनी कामगिरी बजावलीच आहे तशी.
मनविसेचे शहर उपाध्यक्ष समर्थ ओझांच्या नेतृत्वाखाली हे तरुण मनसैनिक गेले २१ दिवस छ्त्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अल्पोहाराची सोय करत आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रसाद आणि डॉ. पवार यांच्या हस्ते झाले.
हा उपक्रम राबवताना या तरुणांना कर्नाटकातील गुलबर्गा येथील चंद्रकांत बैळजुरगी हा रुग्ण भेटला. त्याला पोटाच्या उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावरील उपचार पूर्ण झाल्याने त्याला सोडण्यात आले. पण त्याची अवस्था इतकी वाईट होती की त्याच्याकडे ना औषधांसाठी पैसे होते, ना घरी जाण्यासाठी तिकिटाला.
चंद्रकांत बैळजुरगीच्या घरी आई वडील नाहीत. घरी केवळ एक बहिण आहे. त्यात औषधे आणि घरी परतण्यास पैसे नसल्याने तो रडत होता. उपचारासाठी आलेल्या अकलूजच्या रहिवाशांनी नाश्ता वाटप करणाऱ्या मनसैनिकांना ही गोष्ट सांगितली. त्याचदिवशी संकेत जेसुदास यांचा वाढदिवस होता. तेही या नाष्टा वाटप या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी आर्थिक मदत केली. त्यातून समर्थ ओझा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रकांत बैळजुरगीला औषधे घेऊन दिली. घरी जाण्यासाठी पुरतील इतके पैसे दिले. रेल्वेचे तिकीट काढून रेल्वेत बसवून त्यांच्या गावी पाठवले दिले. गुलबर्गा येथील मित्रांना सांगून त्याला त्यांच्या घरी सुखरूप पोचवले. गुलबर्गा येथून त्या मित्राने चंद्रकांतसोबत पाठवलेला व्हिडीओ भावनेनं ओथंबलेला आहे. मित्रांनी देखील चंद्रकांत हे रेल्वे स्थानकावर पोचल्याचे फोटोही पाठवून दिला. यासाठी मनविसेचे शहर उपाध्यक्ष समर्थ ओझा, विभाग अध्यक्ष पवनकुमार दोरकर, सागर सुरवसे, शरद दोरकर, प्रशांत भोसले, प्रशांत सरवदे, योगेश हीरेमठ यांच्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाहा व्हिडीओ: