मुक्तपीठ टीम
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मुंबईच्या समुद्रकिनारी जुहू बीच येथे आयोजित केलेल्या सचित्र प्रदर्शनास आज समुद्र किनारा पहावयास आलेल्या अनेक पर्यटकांनी आवर्जून भेट दिली. यावेळी कोविड काळात महाराष्ट्र शासनाने केलेल्या उत्तम कामगिरीची नोंद सामान्य माणसाने घेतली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या विविध योजना व विकासाकामांवर आधारित चित्रमय प्रदर्शन १ मे २०२२ पासून भरविण्यात आले असून हे प्रदर्शन ५ मे २०२२ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
या प्रदर्शनास विशेषत: जुहू चौपाटी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थीनी, शेतकरी, सामान्य जन तसेच समुद्र किनारी फिरावयास आलेल्या पर्यटकांनीही भेट दिली.
मुंबईतील वरळी सी-फेस येथे कॉमन मॅन पुतळा परिसरात आयोजित केलेल्या सचित्र प्रदर्शनास आज अनेक नागरिकांनी भेट दिली.हे सरकार सर्वांना न्याय देणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आम्हाला गर्व आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण शेवाळे यांनी प्रदर्शनाला भेट देवून व्यक्त केली. तसेच शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती जाणून घेतली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमार्फत शासनाच्या विविध योजना व विकासाकामांवर आधारित चित्रमय प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाला सर्वच घटकातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज अनेक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले.शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती अत्यंत महत्वपूर्ण आहे !’,अशा प्रतिक्रीया दिल्या.
प्रदर्शनस्थळी उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली. मुंबईतील वरळी सी-फेस येथे कॉमन मॅन पुतळा परिसरात हे प्रदर्शन दि. १ ते ५ मे या कालावधीत सर्वसामान्यांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.