Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑनलाइन फँटसी गेम्सचा अनिर्बंध स्वैराचार थांबणार, केंद्र सरकारची आवश्यक पावलं

November 7, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
केंद्र सरकार

मुक्तपीठ टीम

केवळ क्रिकेट आणि फुटबॉल आता फक्त मैदानावर खेळले जात नाहीत, तर ऑनलाईन मैदानातही रंगतात. ऑनलाइन खेळल्या जाणाऱ्या खेळांचा व्यवसाय देशात झपाट्याने फोफावत आहे. यामुळेच सरकार आता यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे आणण्याच्या तयारीत आहे जेणेकरुन, फँटसी खेळ व्यवसायात दडलेल्या प्रचंड क्षमतेचा वापर करता येईल आणि त्याचवेळी जुगाराचा धोका टाळता येईल. तज्ज्ञांच्या मते, भारतात सध्या ऑनलाइन फँटसी गेम्ससाठी कोणताही स्पष्ट कायदा नाही. गरज भासल्यास यासंबंधीची प्रकरणे १८६७ च्या दि पब्लिक गॅम्बलिंग अॅक्ट कायद्यांतर्गत ठेवता येतील.

 

काही महिन्यांपूर्वी, ऑनलाइन फँटसी गेम्सबाबत राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला होता. त्यासंबंधी एक मसुदा जारी करण्यात आला होता. आता पुन्हा ऑनलाइन फँटसी गेम्ससंदर्भात राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे आणण्यासाठी वेगानं प्रयत्न सुरु आहेत. अशा गेम्सबाबत राज्यांनी वेगवेगळे कायदे आणले तर त्याच्याशी संबंधित व्यवसायाच्या विकासावर परिणाम होण्याची भीतीही सरकारला आहे. अलीकडेच, कर्नाटकाने ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी आपल्या पोलीस कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे त्या राज्यात त्याला जुगाराच्या श्रेणीत ठेवले जाईल. तर उद्योग क्षेत्रातील लोकांच्या दाव्यानुसार, ऑनलाईन गेम हे जुगार नसून कौशल्याचे खेळ आहेत.

 

भारत जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची बाजारपेठ

  • फिक्कीच्या गेमिंग कमिटीचे संयोजक आणि ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनचे सीईओ रोलँड लँडर्स यांच्या मते, भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा ऑनलाइन गेमिंग बाजार आहे.
  • हे एक नवे क्षेत्र आहे ज्यांची उलाढाल २०२५ पर्यंत ३ अब्जापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
  • कर्नाटक सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे स्टार्टअप क्षेत्राला धक्का बसला आहे.

 

जीएसटी ३००० कोटींपर्यंत मिळू शकतो

  • केपीएमजी आणि प्राइसवॉटरहाऊस कूपर्सच्या अहवालानुसार, येत्या तीन ते पाच वर्षांत ऑनलाइन फँटसी गेम्सच्या व्यवसायात भारतात १०,००० कोटी रुपयांपर्यंतची विदेशी गुंतवणूक शक्य आहे.
  • एवढेच नाही तर या गेम्सच्या व्यवसायातून भारताला वार्षिक ३००० कोटींपर्यंतचा जीएसटी मिळू शकतो.
  • ऑनलाइन फँटसी गेम व्यवसायामुळे पुढील तीन ते पाच वर्षांत ५००० प्रत्यक्ष आणि ७००० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

 

मिळालेल्या आकडेवारीनुसार पुढील माहिती

  • १०० दशलक्षाहून अधिक लोक ऑनलाइन फॅंटसी गेम खेळतात.
  • १० हजार कोटींपर्यंत विदेशी गुंतवणुकीची शक्यता २१२ टक्के गेमर्स वाढले.
  • २०१६ मध्ये १० कंपन्या व्यवसाय करायच्या यामध्ये सध्या १४० कंपन्यांचा सहभाग आहे.
  • २०१८-१९ या आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय ९२० कोटी होता.
  • आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये एकूण व्यवसाय २,४७० कोटी रुपये आहे.
  • सध्या एकूण उलाढाल २५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
  • ऑनलाइन गेमिंगमध्ये आघाडीवर फॅंटसी गेम आहे.

 


Tags: governmentmuktpeethonline fantasy gameonline gameऑनलाइन गेम्सऑनलाइन फँटसी गेम्सकेंद्र सरकारभारतमुक्तपीठ
Previous Post

चीनच्या सीमेवरही आता 4G संपर्क, जियोने लडाखमध्ये पुरवली सेवा!

Next Post

पालघरमधील आदिवासी महिलांच्या जीवनात मधमाशी पालनातून गोडवा

Next Post
honey making

पालघरमधील आदिवासी महिलांच्या जीवनात मधमाशी पालनातून गोडवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!