मुक्तपीठ टीम
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता १७ टक्क्यांवरुन २८ टक्के केला आहे. आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने महागाईवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच निवृत्ती वेतनधारकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
आता तीन भाग, आणखी तीन भाग बाकी!
• देशात तब्बल ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि ६१ लाख निवृत्ती वेतनधारकांना या वाढीचा फायदा होणार आहे.
• कोरोनाच्या महामारीतील आर्थिक संकटामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता जून २०२१पर्यंत रोखण्यात आला होता.
• त्यामुळे सरकारने महागाई भत्त्यात केलेल्या वाढीमुळे नक्कीच त्यांना फायदा होईल.
• मात्र, कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे अद्याप ३ हप्ते मिळणे बाकी आहेत.
• आता मिळणार असलेले हप्ते १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ चे आहेत.
महागाई भत्ता म्हणजे काय?
• महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक भाग असतो.
• देशातील महागाई कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देत असते.
• तो काही कालावधीनंतर वाढविलाही जातो.
• सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा नक्कीच फायदा होतो.
सरकारने जाहीर केलेल्या महागाई दरांची आकडेवारी
• होलसेल प्राइस इंडेक्स (WPI) जूनमध्ये घसरुन १२.०७ टक्के झाला आहे, जो मे महिन्यात १२.९४ टक्क्यांवर पोहचला होता.
• जून २०२० मध्ये घाऊक महागाई दर १.८१ टक्के होता.
• तर जूनमध्ये घाऊक महागाई दर १२ टक्क्यांहून अधिक होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खनिज तेल महाग होणे.
• यात पेट्रोल, डिझेल अशा इंधनांचा समावेश होतो.
• तर देशात किरकोळ महागाई दर सलग दुसऱ्या महिन्यात ६ टक्क्यांहून अधिक नोंदवले गेले आहे.
• जूनमध्ये किरकोळ महागाई दर ६.२६ टक्के नोंदविला आहे जो मे महिन्यात ६.३ टक्के होता.