Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“त्यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह महाराष्ट्रातील नेत्यांची लतादीदींना भावांजली

February 6, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Lata Mangeshkar

मुक्तपीठ टीम

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही भावांजली वाहिली आहे.

 

“लतादीदींनी भारतीय संगीत समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले”

 

महान पार्श्व गायिका भारत रत्न लता मंगेशकर जी का निधन देश के हर घर और भारत के तटों से परे एक दुखद खबर है। लता जी का संगीत क्षेत्र, भाषा और समय की सीमाओं को पार कर गया। इसमें सर्वशक्तिमान ईश्वर का आह्वान करने की क्षमता थी। (१/२)

— Bhagat Singh Koshyari (@BSKoshyari) February 6, 2022

 

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते.भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते.

 

आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाई गीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती.अभिजात भारतीय संगीत सुलभ करून लतादीदींनी ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले. आपल्या दैवी स्वरांनी त्यांनी असंख्य जनसामान्य, शेतकरी तसेच कष्टकरी लोकांना सकारात्मक जीवन जगण्याची नित्यनवी उमेद, ऊर्जा व उत्साह दिला.लतादीदी या तब्बल आठ दशके भारतीय चित्रपट सृष्टीची ओळख होत्या. चित्रपट व संगीत सृष्टीच्या सुवर्ण काळातील साक्षात हिरकणी होत्या.

 

भारतरत्न लतादीदी महाराष्ट्राच्या कन्या होत्या याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्या आपल्या जीवनकाळात झाल्या हे आपले सद्भाग्य होते.लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील. या दुःखद प्रसंगी संपूर्ण राज्याच्या वतीने लतादीदींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

 

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीताचं अपरिमीत नुकसान – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 

गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. आठ दशकांहून अधिक काळ रसिकांना मंत्रमुग्ध करणारे दैवी स्वर हरपले असून संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुग संपले आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
आम्ही सर्व मंगेशकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. pic.twitter.com/Dv0F8l1jn2

— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 6, 2022

 

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीताचं अपरिमीत नुकसान झाले, या शब्दात जगद्विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

बाळासाहेब थोरात आपल्या शोकसंदेशात म्हणतात, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. त्यांनी आजीवन संगीताची साधना केली. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात आला होता. संगीत क्षेत्रात भारताचे नाव वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. संगीत साधनेतून जगभरात त्यांनी निर्माण केलेली कीर्ती त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहिल. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

 

संगीताचा भावस्पर्शी स्वर हरपला – दिलीप वळसे पाटील

 

आपले स्वरमाधुर्य आणि गानप्रतिभेने संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन अत्यंत वेदनानदायी आहे. भारतीय संगीताचा भावस्पर्शी स्वर आज हरपला आहे. लतादीदींच्या तजेलदार, भावमयी आवाजाच्या आनंदघनामध्ये रसिकांच्या पिढ्यानपिढ्या सुरात न्हाऊन निघाल्या… pic.twitter.com/QZDYAiGNYu

— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) February 6, 2022

 

आपले स्वरमाधुर्य आणि गानप्रतिभेने संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन अत्यंत वेदनानदायी आहे. भारतीय संगीताचा भावस्पर्शी स्वर आज हरपला आहे.अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

लतादीदींच्या तजेलदार, भावमयी आवाजाच्या आनंदघनामध्ये रसिकांच्या पिढ्यानपिढ्या सुरात न्हाऊन निघाल्या आणि यापुढेही हा सूर भारतीय संगीतात अढळ राहील. गानसरस्वती लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

अलौकिक सूर हरपले – अमित विलासराव देशमुख

 

स्वरसम्राज्ञी,#भारतरत्न लता मंगेशकर जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे,त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करणारा लतादीदींचा अलौकिक स्वर आज हरपला आहे.#LataDidi pic.twitter.com/0yV2syVKCl

— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) February 6, 2022

 

“आपल्या अलौकिक सूरांनी संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र मूक झाले आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

“लता दीदींनी आपल्या अतुलनीय सूरांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांना पडद्यावर आवाज देऊन त्यांचे व्यक्तिमत्व खुलविले. प्रत्येक भारतीयाच्या मनातील विविध भावभावना त्यांनी आपल्या गायनातून चपखलपणे व्यक्त केल्या. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती आणि पुढेही राहील.

 

देशाप्रती अत्यंत अभिमान असलेल्या लतादीदी संपूर्ण विश्वात भारताचा अभिमान म्हणून आदरास प्राप्त झाल्या. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.लतादीदींशी देशमुख कुटुंबीयांचे निकटचे संबंध होते त्यांच्या जाण्याने मंगेशकर कुटुंबीयांना झालेल्या दुःखात देशमुख कुटुंबीय सहभागी आहेत “, असेही अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

एका सुरेल युगाचा अंत – डॉ. नितीन राऊत

 

स्वरसम्राज्ञी भारतरत्न मा. #लतामंगेशकर यांच्या निधनाने भारत आणि त्यांचे जगभरातील चाहते निःशब्द झाले आहेत. सर्वसामान्य भारतीयांच्या भावभावनांना आपल्या सप्तसुरांनी स्वर देणारा कंठ आज नेहमीसाठी शांत झाला असला तरी युगानुयुगे त्यांचे स्वर आपल्याला प्रेरणा आणि आनंद देत राहतील! pic.twitter.com/m7Bjv5atL4

— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) February 6, 2022

 

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दु:खद निधनामुळे पार्श्वगायन आणि संगीत क्षेत्रातील एका सुरेल युगाचा अंत झाल्याची शोकसंवेदना ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
लतादीदींनी संगीत क्षेत्रातील आपल्या ७८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकाहून एक सरस अशी तब्बल २५ हजार अजरामर गाणी गायिली. केवळ मराठी वा हिंदीच नव्हे तर जवळपास सर्वच प्रमुख भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन करून कोट्यवधी रसिकांना अलौकिक स्वरानंद दिला!

 

‘ए मेरे वतन के लोगो..जरा आँख मे भर लो पाणी..हे त्यांचे सुमधूर गाणे ऐकून आजही देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग पेटते.

 

लतादीदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर हे गाणे गायिले असता नेहरूजींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. लतादीदींच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची अपरिमीत हानी झाली असून जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत लतादीदींना माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत असून आपल्या अजरामर गाण्यांमधून लतादीदी रसिकांच्या हृदयात कायमच राहतील, अशा शब्दात डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात- रश्मी ठाकरे

 

लतादिदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्याने आमच्या परिवारावर मोठाआघात झाला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

 

बाळासाहेब असतांना आणि नंतर देखील लतादिदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दिदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केले आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 

आमच्या हृदयात एक मोठी पोकळी सोडली – अमृता फडणवीस

भारताचा अमर अभिमान, भारतीची गानकोकिळा, त्यांनी आमच्या हृदयात एक मोठी पोकळी सोडली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.


Tags: Amit Vilasrao Deshmukhbalasahebh thoratbhagat singh koshyaridilip walse patilDr. Nitin Rautlata mangeshkarMaharashtrarashmi thackerayअमित विलासराव देशमुखडॉ. नितीन राऊतदिलीप वळसे पाटीलबाळासाहेब थोरातभगत सिंह कोश्यारीरश्मी ठाकरेलता मंगेशकर
Previous Post

भारतरत्न लता मंगेशकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

Next Post

“ऐ मेरे वतन के लोगों” : लता मंगेशकरांच्या गाण्यामुळे आजही कोट्यवधी भारतीय हेलावतात! वाचा ‘ते’ गाणं…

Next Post
Lata Mangeshkar

“ऐ मेरे वतन के लोगों” : लता मंगेशकरांच्या गाण्यामुळे आजही कोट्यवधी भारतीय हेलावतात! वाचा 'ते' गाणं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!