Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“साहित्य, संगीत व कला या विषयात ज्याला आवड नाही अशी व्यक्ती पशूतुल्यच” – राज्यपाल कोश्यारी

राजभवनात पहिले 'कलाकार व लेखकांचे निवासी शिबिर'संपन्न

November 7, 2021
in featured, सरकारी बातम्या
0
Raj Bhavan’s first ‘Artists and Writers - in Residence’ programme concludes 3

मुक्तपीठ टीम 

मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्तम कृती असून मनुष्यमात्रांमध्ये देखील कलाकार व लेखक नवसृजनाचे दैवी कार्य करीत असतात. हे नवसृजन समाजाला समृद्ध करीत असते. साहित्य, संगीत व कला या विषयात ज्याला आवड नाही अशी व्यक्ती पशूतुल्यच म्हणावी लागेल, असा संदर्भ देताना साहित्य, संगीत व कलेचा उपयोग उन्नत समाज घडविण्यासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे आयोजित पहिल्या एक आठवड्याच्या कलाकार व लेखकांच्या निवासी शिबिराची शनिवारी सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते. शिबिराची संकल्पना व नियोजन इतिहासकार व लेखक विक्रम संपत यांनी केले होते.
Raj Bhavan’s first ‘Artists and Writers - in Residence’ programme concludes 2
शिबिर समारोप कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, शिबिरात सहभागी झालेले डॉ विक्रम संपत, रहस्यकथा लेखिका मंजिरी प्रभू, बंगलोर येथील नृत्य दिग्दर्शिका मधू नटराज व दिल्ली येथील सृजनात्मक लेखक व संपादकीय चित्रण कलाकार रणक सिंह मान प्रामुख्याने उपस्थित होते.
राजभवन येथे कलाकार व लेखकांची कार्यशाळा आयोजित करून आपण त्यांना उपकृत केले नाही तर त्यांनी आपल्या राजभवनातील वास्तव्याने आपणांस गौरवान्वित केले, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले. संगीत व साहित्य यांना भौगोलिक सीमांचे बंधन नसून ते मनुष्याला दुःख विसरायला लावते, असे उद्‌गार राज्यपालांनी यावेळी काढले.

मुंबई विद्यापीठात ‘नृत्य विभाग सुरु करणार : डॉ पेडणेकर

मुंबई विद्यापीठात ललित कला, लोककला व संगीत विभाग आहे; मात्र नृत्य विभाग नाही, याबाबत नृत्य दिग्दर्शिका मधू नटराज यांनी केलेल्या निरीक्षणाची दखल घेऊन लवकरच विद्यापीठात नृत्य विभाग सुरु करण्याबद्दल आपण पावले उचलणार असल्याचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांनी यावेळी आश्वस्त केले.

राजभवन येथे राज्यातील क्रांतिकारकांचे दालन सुरु करण्यासाठी सहकार्य करणार : डॉ विक्रम संपत

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना राजभवन येथील भूमिगत बंकरमध्ये महाराष्ट्रातील विविध क्रांतिकारकांचे प्रेरणादायी दालन स्थापन करावे. या कार्यात शिबिरात सहभागी झालेले सर्व कलाकार व लेखक सहकार्य करतील, असे आश्वासन डॉ विक्रम संपत यांनी सांगितले.
राजभवनातील या दालनामध्ये वासुदेव बळवंत फडके, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, चाफेकर बंधू, गणेश वैशंपायन, व्ही.बी. गोगटे, यांसह इतर क्रांतिकारकांचा समावेश असावा, तसेच सन १९४६ साली मुंबई येथे रॉयल नेव्ही विरुद्ध झालेल्या नौदलाच्या सशस्त्र लढ्याचा इतिहास नमूद केला जावा, असेही त्यांनी सांगितले.
विविध क्षेत्रातील लोकांकरिता राजभवन खुले करून राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवनाचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण केले असे डॉ विक्रम संपत यांनी यावेळी सांगितले.
Raj Bhavan’s first ‘Artists and Writers - in Residence’ programme concludes 1

‘मुंबई विद्यापीठाला संगीत ठेवा भेट’

देशाच्या कानाकोपऱ्यातून महत्प्रयासाने पंधरा हजार जुन्या ग्रामोफोन रेकॉर्डस् जमवून आपण भारतीय संगीताचे देशातील पहिले ऑनलाईन आर्काइव्ह तयार केले असून त्याची डिजिटल आवृत्ती मुंबई विद्यापीठाला भेट देत असल्याचे डॉ विक्रम संपत यांनी यावेळी जाहीर केले. डिजिटल आर्काइव्ह संगित क्षेत्रातील संशोधक व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.
लेखिका मंजिरी प्रभू यांनी राजभवनावर आधारित रहस्य – गूढकथा लिहिण्याचे प्रस्तावित केले, तर रणक सिंह मान यांनी राजभवनाला डिझाईन व डिजिटल उपक्रमाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
Raj Bhavan’s first ‘Artists and Writers - in Residence’ programme concludes 0
यावेळी नृत्यांगना मधू नटराज यांनी नृत्याच्या माध्यमातून सरस्वती वंदना सादर केली तर मुंबई विद्यापीठाच्या आजी – माजी विद्यार्थ्यांच्या चमूने सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला.
राजभवन येथील शिबिराचे काळात कलाकार व लेखकांनी कला क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या भेटी घेतल्या तसेच सर जे जे कला महाविद्यालय, मुंबई विद्यापीठाच्या संगीत, नाट्य व लोककला विभागाला तसेच एशियाटिक सोसायटीला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Tags: dr suhas pednekargovernor bhagat singh koshyariJJ College of Artsmanjiri prabhumumbai universityraj bhavanranak singhravindra kulkarnivikram sampatजे जे कला महाविद्यालयडॉ सुहास पेडणेकरभगत सिंह कोश्यारीमंजिरी प्रभूमुंबई विद्यापीठरणक सिंहरवींद्र कुलकर्णीराजभवनविक्रम संपत
Previous Post

वैचारिक प्रगतिशील रंगभूमीचा वारसा चालवणारे ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे रंगकर्मी !

Next Post

स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती घटकांकरीता ‘मार्जिन मनी’साठी अर्जाचे आवाहन

Next Post
standup india scheme

स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती घटकांकरीता ‘मार्जिन मनी’साठी अर्जाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!