मुक्तपीठ टीम
लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यानुसार सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहायक संचालक, वरिष्ठ व्याख्याता, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, उपविभागीय अभियंता या पदांवर ही भरती होणार आहे. याअंतर्गत एकूण ६७ पदांची भरती केली जाणार आहे. त्याच वेळी, या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मे २०२२ पर्यंत आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सहायक रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी २२ जागा, सहायक संचालक या पदासाठी ४० जागा, उपविभागीय अभियंता या पदासाठी ०१, वरिष्ठ वैज्ञानिक ऑफिसरसाठी ०१ आणि वरिष्ठ व्याख्यातासाठी १ रिक्त जागा असतील. आयोगाने जारी केलेल्या माहितीनुसार, या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना विहित शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक वाचावी लागेल, तेव्हाच अर्जदार अर्ज करू शकतील. यासह, अर्जाची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच अर्ज करा, कारण फॉर्ममध्ये काही तफावत आढळल्यास, अर्ज नाकारला जाऊ शकतो.
शुल्क
पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून २५ रूपये शुल्क आकारले जाणार तर, एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोखीने किंवा एसबीआयच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/ मास्टर मनी क्रेडिट/ डेबिट कार्ड वापरून पैसे पाठवून जमा करावे लागतील. तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी/ कोणत्याही समाजातील महिला उमेदवारांना या पदांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.