मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाच्या प्रकरणामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे प्रत्येकाला चिंता सतावत असते. त्याचबरोबर गुगलने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. गुगल एखाद्या महान व्यक्तिमत्त्वाची आठवण ठेवण्यासाठी किंवा लोकांना जागृत करण्यासाठी डुडल बनवते. जे नेटकऱ्यांना आवडतेच आवडते. यावेळेस गुगलने डुडल बनवून लोकांना मास्कचे महत्त्व सांगितले आहे.
हे डुडल मास्कचे महत्त्व समजवून सांगते. लोकांनी मास्क वापरणे किती महत्त्वाचा आहे याची माहिती देण्याचे काम केले गेले आहे. एवढेच नव्हे तर डुडलमध्ये कोरोना विषाणू टाळण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. डूडल मास्कबद्दल माहिती देते, ‘मास्क वापरा, जीव वाचवा.’ असा संदेश देते. पुढील संदेशात ‘चेहरा झाकून ठेवा, आपले हात स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर ठेवा’ असा संदेश दिला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संदेश-
१. सतत आपले हात स्वच्छ करा. साबण आणि पाणी वापरा किंवा सॅनिटाइझर वापरा.
२. ज्यांना खोकला किंवा शिंका येतात, त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा.
३. मास्क्सचा वापर करा.
४. डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करू नका.
५. आपल्याला बरे वाटत नसेल तर घरीच रहा.
६. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होत असेल तर उपचार घ्या.
यापूर्वी गुगलने डूडल बनवून कोरोना योद्ध्यांचे आभार मानले होते. आता गुगलचे डुडल्स आपत्कालीन सेवा कामगार, डॉक्टर, परिचारिका, प्रसूती कर्मचारी, शेतकरी यांना खास धन्यवाद देत आहेत.
पाहा व्हिडीओ: