मुक्तपीठ टीम
गुगलवर विज्ञान, तंत्रज्ञान, खाद्यपदार्थ आणि वैयक्तिक माहिती या सर्वांशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध असते. असे मानले जाते की गुगलवर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. हे काही प्रमाणात खरेही आहे. गुगलवर विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता २०२२ हे वर्ष संपणार आहे. यावेळी गुगल सर्च २०२२ ची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सुष्मिता सेन, अब्दु रोझिक यांचाही समावेश आहे.
गुगलवर ‘या’ सर्वांना का सर्वाधिक सर्च का केलं गेलं? जाणून घ्या कारण…
१. सुष्मिता सेन
- गुगल सर्च इंजिनवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या लोकांमध्ये सुष्मिता सेनचा समावेश आहे.
- टॉप १०च्या यादीत सुष्मिता पाचव्या तर ललित मोदी चौथ्या क्रमांकावर आहे.
- १४ जुलै रोजी आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचे नाते अधिकृत केले.
- यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. ही बातमी व्हायरल झाल्यापासून अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात आले.
- मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या.
२. अंजली अरोरा
- अंजली अरोरा हिने कच्छा बदाम या गाण्यावर बनवलेले रील खूप लोकप्रिय झाले.
- या रीलने त्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली.
- लोकांनी तिला गुगलवर खूप सर्च केले.
- अंजली एकता कपूरच्या लॉक अप शोमध्येही दिसली होती.
- शोमध्ये तिची मुन्नावर फारुकीसोबतची प्रेमकहाणी पाहायला मिळाली. हे फक्त शो पर्यंत आणि शो नंतर असले तरी दोघेही एकमेकांना फक्त मित्र म्हणायचे.
३. अब्दू रोझिक
- सातव्या क्रमांकावर तजाकिस्तानी गायक अब्दू रोझिक आहे, जो सध्या बिग बॉस१६ मध्ये दिसत आहे.
- त्याच्या या क्यूटनेसवर चाहते त्याला खूप पसंत करत आहेत.
- तो ज्या पद्धतीने बोलतो, त्यावरून सर्वांचे मन त्याच्यावर येते.
- अब्दूचे Avlod Media नावाचे युट्यूब चॅनल आहे आणि त्याचे ५८० केपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
- इंस्टाग्रामवर त्याचे ६.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
या वर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींच्या यादीत कोण-कोण आहे?
- नुपूर शर्मा
- द्रौपदी मुर्मू
- ऋषी सुनक
- ललित मोदी
- सुष्मिता सेन
- अंजली अरोरा
- अब्दु रोझिक
- एकनाथ शिंदे
- प्रवीण तांबे
- एम्बर हर्ड