मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी टेलीग्राम प्रयत्न करीत असतानाचा आता आणखी एक नवी स्पर्धा उभी ठाकणार आहे. गुगलने आता आपल्या जीमेलमध्येच चॅटिंग फिचर दिले आहे. जीमेल जगातील सर्वाधिक लोकप्रिय ईमेल अॅप असल्याने स्वाभाविकच कोट्यवधी यूजर्सकडे तो आपोआपच पोहचलेले आहे. त्यामुळे फेसबूक या टेक जायंटच्या व्हॉट्सअॅप या चॅटिंग अॅपसमोर गुगल या दुसऱ्या टेक जायंटच्या चॅटिंग अॅपची स्पर्धा उभी ठाकणार आहे.
व्हॉट्सअॅपबरोबर स्पर्धा करणे आजवर तरी कुणाला शक्य झालेले नाही. फेसबुकलाही ते मॅसेंजरच्या माध्यमातून शक्य झाले नाही. त्यामुळे फेसबुकनेच व्हॉट्सअॅपलाच टेकओव्हर केले होते. या अॅपमुळे पूर्वीच्या ब्लॅकबेरी मॅसेंजर म्हणजेच बीबीएमचा बाजार उठला. गुगलचे आजवरचे प्रयत्नही सफल झाले नाहीत. आता मात्र परिस्थिती काहीशी बदललेली आहे. व्हॉट्सअॅप त्याच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे काही काळ वादात सापडला होता आणि याच कारणामुळे बर्याच जणांनी व्हॉट्सअॅपचा वापरही टाळला आहे. अशा परिस्थितीत बर्याच कंपन्या या संधीचा फायदा घेत आहेत. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलीग्रामने यापूर्वीच स्पर्धेत स्वत: ची ओळख करुन दिली आहे. त्यांचा वापर वाढला, परंतु खूप मोठे यश मिळालेले नाही. पण आता गुगलकडून व्हॉट्सअॅप आणि टेलीग्राम या स्पर्धेत जीमेल अॅपमध्ये एक उत्तम चॅटिंग फीचर देण्यात आले आहे.
गुगलचॅट अॅप आहे तरी कसे?
• जीमेल वापरकर्ते गुगलचॅट अॅपला अॅन्ड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसमध्ये इंटिग्रेट करू शकतात.
• जीमेलमध्ये वापरकर्त्यांना मेल व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी रूम व मीटसह तयार केले जाईल.
• जीमेलचे चॅट अॅप गुगल वर्कस्पेस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते, जे वैयक्तिक खात्यातदेखील उपलब्ध केले जात आहे.
• हे सुलभ अटींमध्ये समजून घेतल्यास, वापरकर्त्यांना आता अॅपच्या तळाशी ४ टॅब मिळतील.
गुगलचॅट अॅपचा कसा वापर करावा?
• गुगलचे नवीन चॅटिंग फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना आधी जीमेल अॅप अपडेट करावे लागेल.
• गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस वापरकर्त्यांना अॅपल अॅप स्टोअरवर जावे लागेल.
• अॅप अपडेट झाल्यानंतर, वापरकर्त्यांना जीमेल उघडावे लागेल, जिथे त्यांना वरच्या डाव्या स्क्रीनवरील सँडविच बटणावर क्लिक करावे लागेल. हे साऊंडबार पर्याय ओपन करेल.
• यानंतर खाली स्क्रोल करा आणि सेटिंग ऑप्शनवर जा. येथे आपल्याला आपले वैयक्तिक खाते निवडावे लागेल.
• येथे चॅट पर्याय दिसेल, ज्यास इनएबल करावे लागेल.
• त्यानंतर जीमेल अॅप रीस्टार्ट करा.
• त्यानंतर चॅटिंग पर्याय जीमेल अॅपच्या तळाशी दिसेल, जेथे वापरकर्ते सहजपणे चॅट करू शकतील.
पाहा व्हिडीओ: