मुक्तपीठ टीम
फोल्डेबल फोनची क्रेझ हळुहळु वाढताना दिसत आहे. सॅमसंगने सुरुवात केली आणि पुन्हा मोठ्या स्क्रिन देतानाच फोल्डेबल सुविधेमुळे छोट्या आकाराची सुविधा देणारे फोन ग्राहकांच्या पसंतीस येत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या नवे फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत सॅमसंग आणि हुआवे व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात दाखल झाले आहेत. फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुगलने देखील प्रवेश केला आहे. गुगलचा फोल्डेबल स्मार्टफोन पुढील वर्षी लॉन्च होऊ शकतो. गुगलच्या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये Pixel 5 कॅमेरा असेल.
गुगलच्या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये Pixel 5 कॅमेरा
Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन्स टेन्सर चिपसेटसह उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये आढळलेला कॅमेरा सेटअप मागील पिक्सेल डिव्हाइसपेक्षा खूपच चांगला आहे. रिपोर्टमध्ये गुगल कॅमेरा एपीके फाइल्सचा संदर्भ देत असे म्हटले आहे की फोल्डेबल पिक्सेल स्मार्टफोनचे कोडनेम ‘पिपिट’ आहे आणि त्याला गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या पिक्सेल 5 चा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा कॅमेरा 12.2 मेगापिक्सेल (Sony IMX363 सेन्सर) चा आहे, जो याआधी Pixel 3 मध्ये देखील दिसला आहे.
Pixel 6 सेल्फी कॅमेरा फ्रंट ला उपलब्ध होणार. प्राथमिक कॅमेरा व्यतिरिक्त, फोनमध्ये अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. फोन फोल्ड केल्यावर हा सेन्सर वापरता येतो. याशिवाय या आगामी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचे इनर आणि आऊटर कॅमेरेही मिळू शकतात.
गुगलच्या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये Pixel 6 कॅमेरा नसणार
Pixel 6 सिरीजचा प्राथमिक कॅमेरा यामध्ये उपलब्ध होणार नाही. फोनच्या लॉन्च तारखेबद्दल कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र दरम्यान एका रिपोर्टमध्ये कंपनीच्या या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. 9to5गुगल वर विश्वास ठेवला तर, गुगल चा पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन Pixel 6 आणि Pixel 6 Pro मध्ये ऑफर केलेला कॅमेरा यामध्ये नसेल.