मुक्तपीठ टीम
आरोग्य क्षेत्रातील चांगली बातमी ब्रँडेड औषधांपेक्षा स्वस्त जन औषधी दुकानांची विक्री वाढत असल्याची आहे. तसेच या दुकानांमधून अवघ्या एक रुपये किंमतीच्या सॅनिटरी नॅपकिनची विक्री एक कोटीवर गेल्याची आहे.
देशातील 7064 प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रांमधे 484 कोटी रुपयांच्या औषधांच्या विक्रीची नोंद झाली आहे. ही दुकाने ब्रँडेड नसलेली जेनरिक औषधे विकतात. मागील आथिर्क वर्षापेक्षा हा आकडा 60 टक्क्यांनी अधिक आहे, त्यामुळे भारतीय नागरिकांच्या खर्चात अंदाजे 3000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी आज ही घोषणा केली. भारत सरकारने जन औषधी केंद्रासाठी 35 कोटी 51 लाख रुपये निधी दिला होता, त्यामुळे नागरिकांची 2600 कोटी रुपयांची बचत झाली. अशाप्रकारे सरकारने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयामागे नागरिकांचे प्रत्येकी 74 रुपये वाचले.
देशभरातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी पाऊल टाकत आजपर्यंत जन औषधी केंद्रात “सुविधा” सॅनिटरी पॅड प्रत्येकी 1 रुपया या प्रमाणे 10 कोटीपेक्षा जास्त पॅड तेथे विकले गेले आहेत. जन औषधीच्या “सुविधा” सॅनिटरी पॅड खरेदीसाठीची 3.6 कोटी रुपयांची ऑर्डर डिसेंबर 2020 मध्ये दिली आहे. तसेच जन औषधीच्या “सुविधा” सॅनिटरी पॅड खरेदीसाठीची 30 कोटी रुपयांची निविदाही नक्की करण्यात आली आहे.