मुक्तपीठ टीम
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. या योजनेबरोबरच सरकारची आणखी एक लाभदायी योजना आहे. पीएम किसान मानधन ही ती योजना. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ३६ हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो.म्हणजेच महिन्याला ३ हजार रुपये मिळतील.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागणार नाहीत आणि कोणतीही कागदपत्रही द्यावी लागणार नाहीत. ही एक प्रकारे निवृत्ती वेतन योजना आहे. या फंडाची काळजी घेण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीला नेमण्यात आले आहे.
या योजनेचे नाव ‘पीएम किसान मानधन योजना’ आहे. परंतु या योजनेचा लाभ केवळ पंतप्रधान किसान निधीशी संबंधित असणाऱ्यानाच मिळू शकणार आहे.
पंतप्रधान किसान मानधन योजना आहे तरी काय?
• पहिल्या टप्प्यातील ५ कोटी शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देण्यात येईल.
• योनजेअंतर्गत एकूण १२ कोटी अल्पभूधारक आणि सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान किसान मानधन योजनेची खास वैशिष्ट्ये
• या योजनेमध्ये किमान प्रीमियम ५५ ते २०० रुपयांपर्यंत आहे.
• जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ५० टक्के रक्कम मिळेल.
• जर तुम्हाला ही पॉलिसी सोडायची असेल तर त्यामध्ये जमा केलेले पैसे आणि त्याचं व्याज तुम्हाला मिळेल.
• या योजनेत नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
लाभ कोणाला मिळणार
• जास्तीत जास्त २ हेक्टर शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
• जर पात्रता निकष पूर्ण केले नाही तर तो शेतकरी अपात्र ठरविला जाईल आणि या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
• याशिवाय १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत नोंदणी करू शकणार नाहीत.
पाहा व्हिडीओ