मुक्तपीठ टीम
सोन्याच्या दागिन्यांसाठी आता हॉलमार्किंग अनिवार्य आहे. ज्वेलर्स केवळ हॉलमार्क केलेले दागिने खरेदी आणि विक्री करू शकतील. त्यामुळे आपल्याला काय फायदा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. हॉलमार्क म्हणजे एकप्रकारे तुम्ही घेतलेल्या सोन्याच्या शुद्धतेची सरकारी गॅरंटी असेल. एकप्रकारे जसे काही उत्पादनांसाठी ‘आयएसआय’ प्रमाणित असणे हे आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला दर्जाची खात्री पटते. तसेच हॉलमार्कमुळे आपल्या मनातील मनातील सोन्याच्या शुद्धतेविषयीची भीती संपणार आहे.
सोन्याचे हॉलमार्किंग काय आहे?
१. हॉलमार्क ही सरकारची गॅरंटी असणार आहे.
२. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच बीआयएस ही भारतातील एकमेव एजन्सी हॉलमार्क देते.
३. हॉलमार्किंगमध्ये ते उत्पादन विशिष्ट मापदंडांवर प्रमाणित केले जाते.
४. बीआयएस ही अशी संस्था आहे जी ग्राहकांना देण्यात येत असलेल्या सोन्याची तपासणी करते.
५. सोन्याच्या नाण्यावर किंवा दागिन्यांवर हॉलमार्कसह बीआयएस लोगो ठेवणे आवश्यक आहे. बीआयएस लोगो हे दर्शवते की, याच्या शुद्धतेची लॅबमध्ये तपासली केली गेली आहे.
असे असले तरीही जुन्या सोन्याचे काय? आपल्यातील अनेकांच्या मनात असे प्रश्न असतील की, त्यांच्याकडे ठेवलेल्या जुन्या सोन्याचे काय होईल. यावरही उपाय आहेत. त्यासाठी मुक्तपीठच्या वेबसाइटवरील चांगल्या बातम्या कॅटेगरी तपासा.
जुन्या सोन्यासाठी हॉलमार्क कसे मिळणार?
• हॉलमार्कविना असलेले सोने बदलून घेता येणार आहे.
• तुम्हाला पाहिजे असल्यास सोनाराकडून आपल्या सोन्यावर हॉलमार्क मिळवू शकता.
• बीआयएस सोनारांना ५ वर्षांसाठी ११,२५० रुपये परवाना शुल्क आकारून हा परवाना देते.
• त्यानंतर सोनार हॉलमार्क केंद्रात दागिने तपासून घेतात आणि कॅरेटनुसार हॉलमार्क देतात.
• सामान्य माणूस थेट केंद्रात जाऊन जुन्या दागिन्यांवर हॉलमार्क करू शकत नाही.
जुने दागिने विकू शकता येतील की नाही?
• बीआयएसच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांकडून जुन्या सोन्याचे दागिने खरेदी केल्यावर, ते दागिने वितळवून नवीन दागिने तयार करतात.
• जुने दागिने एक प्रकारे ज्वेलर्ससाठी कच्चा माल आहे.
• १५ जून २०२१ नंतरही ग्राहकांना ते विकू शकता येतील आणि हॉलमार्क असलेले दागदागिने विकत घेता येतील.
• नवीन दागिने विकत घेतल्यास मात्र, त्यावर बीआयएस हॉलमार्क असणे आवश्यक आहे.
सर्वसामान्यांना कसा फायदा होईल?
• हे सर्वसामान्यांसाठी फायद्याचे आहे, कारण दागिने खरेदी केल्यावर, सोने प्रत्यक्षात किती शुद्ध आहे हे आतापर्यंत बऱ्याच जणांना ठाऊक नव्हते.
• अशा परिस्थितीत त्यांच्याबरोबर फसवणूक होण्याची शक्यता होती.
• बनावट दागिन्यांपासून ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी व दागिन्यांच्या व्यवसायाचे परीक्षण करण्यासाठी हॉलमार्किंग आवश्यक आहे.
• हॉलमार्किंगचा फायदा असा आहे की, जेव्हा ते सोने विकले जाणार तेव्हा कोणतीही किंमत कमी केली जाणार नाही.
• सोन्याची योग्य किंमत मिळवता येणार.
हॉलमार्क नसल्यास कारावास
• हॉलमार्किंगच्या नियमांचे पालन न केल्यास एका वर्षाची शिक्षा होऊ शकते. बीआयएस कायद्यानुसार, हॉलमार्किंगचे नियम मोडणाऱ्यांना दागिन्यांच्या किंमतीपेक्षा ५ पटीने दंड आणि एक वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.