मुक्तपीठ टीम
जर तुम्ही सोने खरेदी करून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असू शकते. केंद्र सरकारच्या सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड या योजनेअंतर्गत, स्वस्त किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी आहे.
योजनेविषयी महत्त्वाची माहिती
- सरकारची ही योजना ९ ते १३ ऑगस्ट, २०२१ पर्यंत आहे.
- या खरेदी कालावधीत गोल्ड बॉन्डची किंमत ४,७९० रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे.
- तुम्ही या किंमतीत गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकता.
- जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट करतील त्यांना भारत सरकार प्रति ग्रॅम ५० रुपये सूट देईल.
- अशा गुंतवणूकदारांसाठी सोन्याचे मूल्य ४,७४० रुपये प्रति ग्रॅम असेल.
बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने!
- योजनेअंतर्गत सोन्याची किंमत बाजारभावापेक्षा स्वस्त आहे.
- या योजनेत सामील होण्यासाठी किमान एक ग्रॅम सोने खरेदी करणे बंधनकारक आहे.
- कमाल खरेदी मर्यादा ४ किलो आहे.
- योजनेतील बॉन्डचा मॅच्युरिटी कालावधी ८ वर्षे आहे.
- तसेच, पाचव्या वर्षानंतर त्यातून बाहेर पडण्याचा पर्यायही आहे.
- व्याजाबद्दल बोलायचे झाल्यास, ते वार्षिक २.५० टक्के आहे.
योजनेत कशाप्रकारे घेता येणार भाग?
- एसबीआय आणि इतर सरकारी आणि खाजगी बँका सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड योजनेत ऑनलाइन सामील होण्याची संधी देतात.
- जर तुम्ही नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरत असाल तर तुम्हाला योजनेचा पर्याय दिसेल.
- स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे, निवडलेली पोस्ट ऑफिसेस आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातूनही गोल्ड बॉन्ड खरेदी करता येतात.