मुक्तपीठ टीम
कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल हे केवळ एका सहकारी संस्थेवरील सत्ताबदल करणारे नाहीत. तसेच त्यामुळे स्थानिक राजकारणावरच नाही तर समाजकारण आणि महत्वाचं म्हणजे अर्थकारणावरही परिणाम घडवणारे आहेत. त्याचबरोबर एकीकडे राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रिफ यांचं राजकीय वजन वाढवतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावाला ग्रहण लावणारेही आहेत.
गोकूळचा निकाल, बदलणार सारंच!
अख्या कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ढवळून टाकणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल हा महत्वाचा आहे. गोकुळमध्ये अखेर तीन दशकांनंतर सत्तांतर झालं आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीने निवडणुकीत बाजी मारली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक गटाला अवघ्या चार जागांवर समाधान मानवं लागलं आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत २१ पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला १७ जागांवरून विजय मिळाला आहे. आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आलीय.दोन्ही गटांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती..
- गोकुळ दूधसंघातील २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
- या निवडणुकीसाठी ३६५० पात्र सभासद होते, तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
- सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान देत विजय मिळविला आहे.
- सदाशिव मंडलिक यांचा नातू नातू विरेंद्र मंडलिक आला, पण त्यांचा पुतण्या विरोधात लढूनही विजयी झाला.
- अरूण नरकेंचा मुलगा विजयी झाला, पण सत्ता गेली.
- सत्ताधारी पॅनलचे अध्यक्ष रवींद्र आपटे स्वत: पडले.
- गोकुळ दूधसंघात ३० वर्षांनंतर सत्तांतर, सतेज पाटलांची बाजी