मुक्तपीठ टीम
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. त्यामुळे लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळलेला आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी ऑटो कंपन्याही पुढे सरसावत आहेत. तैवानच्या गोगोरो कंपनीने भारत हीरो मोटोकॉर्पशी भागिदारी केल्याची बातमी समोर आली आहे. ही कंपनी भारतात हीरोच्या सहकार्याने इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करेल. याची भारतात गोगोरो व्हिवा या नावाने नोंदणी करण्यात आली आहे.
लाँचिग तारीख आणि किंमत
- या स्कूटरला २७ जूनपासून तैवानमध्ये ऑर्डर करता येईल.
त्याची किंमत ४,१४० डॉलर्स म्हणजेच सुमारे २,६२,७४० रुपये इतकी असेल. - यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीचे फिचर्स आहेत.
- ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क तयार करण्यासाठी प्रख्यात आहे.
- बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानासह ग्राहक कोणत्याही केंद्रावर जाऊ शकतो.
- अॅपमध्ये साइन इन करून, आपण १ मिनिटात बॅटरी पूर्ण चार्ज करू शकतो.
- गोगोरो तैवानमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हिलरची विक्री देखील करते.
- भारतात पुढील वर्षी जानेवारी ते मार्च यादरम्यान ही स्कूटर येण्याची शक्यता आहे.
- तैवानमध्ये त्याची किंमत १८०० डॉलर आहे.
- त्याचबरोबर भारतात तिची किंमत १ लाख ३२ हजार रुपये असेल.
मेंटेनेंस खर्च
- त्याचा मेंटेनेंस म्हणजे देखभाल सामान्य बाइकपेक्षा कमी आहे.
- यासाठी कोणत्याही विशेष सर्व्हिसिंगची आवश्यकता नाही.
- फक्त ऑयलिंग आणि ब्रेकसारख्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
- स्कूटरची बॅटरी बिघडल्यास गोगोरो कंपनी पहिल्या दोन वर्षात ग्राहकांना विनामूल्य बॅटरी बदलण्याची हमी देते.
- बॅटरी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये बदलता येऊ शकते.
- दोन वर्षांत, ग्राहक या बॅटरीला त्याला पाहिजे तितक्या वेळा बदलू शकतो.
- या व्यतिरिक्त ही कंपनी दोन वर्षांसाठी स्कूटरची मोफत दुरुस्तीही करणार आहे.
- ही एका चार्जने ३० किमी / तासाच्या वेगाने ८५ किमी पर्यंत चालू शकते.
- चोरी झाल्यास कंपनीकडून त्यावर एक वर्षाचा विमा देण्यात येईल.