मुक्तपीठ टीम
गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी ‘गोदरेज अॅंड बॉइस’च्या ‘गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट’ या व्यवसायाला ‘न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’कडून (एनपीसीआयएल) ४६८ कोटी रुपयांची सिंगल स्वरुपाची सर्वात मोठी ऑर्डर मिळाली आहे. ‘एनपीसीआयएल’तर्फे उभारण्यात येणाऱ्या, भारतात सर्वोच्च श्रेणी प्राप्त झालेल्या व देशातच विकसीत करण्यात आलेल्या ७०० एमडब्ल्यूइ क्षमतेच्या ‘प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअक्टर्स’साठी (पीएचडब्ल्यूआर) स्टीम जनरेटर तयार करण्याची ‘गोदरेज अॅंड बॉइस’ला मिळालेली ही पहिलीच ऑर्डर आहे. हा प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेशी सुसंगत आहे.
अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये बेसलोड आवश्यकतांसाठी स्वच्छ (अ-खनिज स्वरुपाची) आणि विश्वासार्ह स्रोतापासून मिळणारी उर्जा निर्माण करण्यासाठी स्टीम जनरेटर अत्यावश्यक असतो. या करीता ‘गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट’ची निवड झाली, याचे कारण या कंपनीकडे अतिशय अचूक उपकरणे बनविण्याकरीता लागणारी अभियांत्रिकीतील जागतिक दर्जाची कौशल्ये व क्षमता उपलब्ध आहेत, तसेच धातूशास्त्रामध्ये काम करण्याची कौशल्ये आहेत. गुजरातमधील दाहेज येथील कंपनीच्या नव्या अत्याधुनिक कारखान्यात या स्टीम जनरेटर्सचे उत्पादन करण्यात येणार आहेत.
‘गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट’चे वरिष्ठ उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख हुसेन शरियार म्हणाले, “गेल्या अनेक दशकांपासून ‘गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट’तर्फे प्रक्रिया उद्योगासाठी उच्चस्तरीय, अति महत्त्वाची स्टॅटिक उपकरणे बनविण्यात येत आहेत. भारताच्या प्रतिष्ठित अणु ऊर्जा कार्यक्रमात योगदान देणे ही ‘गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट’मध्ये आमच्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. ही ऑर्डर अलीकडील काळात आम्हाला प्राप्त झालेल्या सर्वात मोठ्या ऑर्डरपैकी एक आहे. आमचा ग्राहक असलेल्या ‘एनपीसीआयएल’चा आमच्या क्षमतांवर असलेला विश्वास अशा प्रकारे यातून अधोरेखित होतो. या ऑर्डरमुळे सरकारच्या अणु ऊर्जा कार्यक्रमासाठी उपकरणांचा प्रमुख पुरवठादार म्हणून आमची स्थिती मजबूत झाली आहे. अणु ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याच्या दृष्टीने भारताकडून जोमाने प्रयत्न होत असताना, त्यामध्ये गोदरेज महत्त्वाची उपकरणे पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.”
‘गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट’विषयी
गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट हा ‘गोदरेज अँड बॉइस’च्या चौदा व्यवसायांपैकी एक आहे. ‘जी अँड बी’ समूहात या व्यवसायाचा कारभार जागतिक स्तरावर सर्वात जास्त आहे. जगभरात तेल आणि वायू, पेट्रोकेमिकल, फर्टिलायझर, ऊर्जा आणि पाणी या क्षेत्रांतील विविध महत्वपूर्ण अॅप्लिकेशन्ससाठी हेवी वॉल्ड रिअॅक्टर्स, प्रेशर व्हेसल्स, हाय प्रेशर हीट एक्सचेंजर्स, कॉलम्स, ट्रे आणि रिअॅक्ट इंटर्नल्स अशा कस्टम बिल्ट प्रक्रिया उपकरणांचे उत्पादन करण्यात गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट आघाडीवर आहे. या कंपनीची ८० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादने निर्यात केली जातात.
अधिक माहितीसाठी, कृपया www.godrej.com ही वेबसाईट पाहा.