Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या प्रेस रिलिज

गोदरेज इंडस्ट्रीजचा वालिया प्रकल्प ग्रीनको प्लॅटिनम मानांकन मिळविणारे पहिले भारतीय रासायनिक उत्पादन केंद्र

वर्ष २०२५ पर्यंत या प्रकल्पात कार्बन तटस्थता, जल तटस्थता आणि कचरा डेपोमध्ये शून्य कचरा निर्मिती साध्य करण्याचे गोदरेज इंडस्ट्रीजचे ध्येय

February 4, 2022
in प्रेस रिलिज
0
GIL first chemical manufacturing company to achieve ‘GreenCo Platinum’ rating

मुक्तपीठ टीम

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड (केमिकल्स) ने ग्रीनको प्लॅटिनम (‘GreenCo Platinum’) मानांकन मिळविणारे पहिले भारतीय रासायनिक उत्पादन केंद्र बनून एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. ‘ग्रीनको’ अर्थात ग्रीन कंपनी रेटिंग सिस्टीम अंतर्गत कंपनीच्या वालिया (गुजरात) येथील उत्पादन प्रकल्पाला हे मानांकन मिळाले असून सीआयआय-सोहराबजी गोदरेज ग्रीन बिझनेस सेंटर (सीआयआय गोदरेज-जीबीसी) येथे त्याबाबतचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

 

ग्रीनको मानांकन पद्धती ही देशात हरित चळवळ निर्माण करण्याच्या दूरदृष्टीने चालविण्यात येते. उर्जा कार्यक्षमता, जल संवर्धन, उत्पादनाचा दर्जा आणि जीवनचक्र मूल्यमापन, नाविन्यपूर्णता, कचरा व्यवस्थापन, हरित पुरवठा साखळी, कच्चा माल संवर्धन व फेरवापर, हरित पायाभूत सुविधा व जैविक सुविधा, परिवर्तनीय उर्जा, जीएचजी उत्सर्जन अशा दहा ठळक निकषांच्या आधारावर हे मानांकन बहाल करण्यात येते. कंपनीच्या कामकाजाचा पर्यावरणावर काय परिणाम घडून येतो याची पडताळणी आणि मूल्यमापन यात केले जाते आणि प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पडताळणी झाल्यानंतर प्रत्येक निकषाकरीता गुण दिले जातात.

 

 

‘उत्तम आणि हरित’ (गुड अँड ग्रीन-‘Good and Green’) या गोदरेजच्या ध्येयधोरणाशी सुसंगत कारभार करणाऱ्या या प्रकल्पाने गेल्या दहा वर्षांत, आपल्या विशिष्ट उर्जा वापरात २६ टक्क्यांनी, पाण्याच्या वापरात ३० टक्क्यांनी कपात घडवून आणलेली असून विशिष्ट हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन ४६ टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळविलेले आहे. वाफ निर्मितीकरीता जीवाश्म इंधनावर असलेले या प्रकल्पाचे अवलंबित्व देखील याच कालावधीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी झालेले आहे. सध्या, या प्रकल्पात वापरात येणाऱ्या उर्जेपैकी ४८ टक्के ही परिवर्तनीय स्त्रोतांद्वारे प्राप्त केली जात आहे. गोदरेज इंडस्ट्रीजचे आता एक समूह या रूपाने वर्ष २०२६ पर्यंत कार्बन तटस्थता, जल तटस्थता आणि कचरा डेपोमध्ये शून्य कचरा निर्मिती साध्य करण्याचे ध्येय आहे.

 

 

या पुरस्काराच्या निमित्ताने बोलताना कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष (केमिकल्स) नितीन नाबर म्हणाले, “शाश्वत विकासासाठी असलेल्या आमच्या तळमळीच्या दृष्टीने ही खूप मोठी झेप आहे. संपूर्ण टीमने कठोर मेहनतीने केलेल्या कामाचे आणि दिलेल्या समर्पित योगदानाचे हे फलित आहे. प्रक्रिया अभियांत्रिकी, नाविन्य, हरित रसायनशास्त्र आणि स्वच्छ तंत्रज्ञान यांचा अंगीकार करून परिचालन अर्थव्यवस्थेचे आमचे उद्दिष्ट सध्या करण्यासाठीचे आमचे प्रत्यत्न आम्ही यापुढेही सुरूच ठेवणार आहोत. आमच्या पुरवठादारांनी देखील शाश्वत पुरवठा धोरणावर अधिक भर द्यावा आणि त्यायोगे त्यांच्या कामकाजात ईएसजी कार्यक्षमता वाढीस लावावी, अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत; जेणेकरून शाश्वत वृद्धीचे आम्हा उभयतांचे दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.”

 

 

 

याला दुजोरा देताना सीआयआय गोदरेज जीबीसीचे कार्यकारी संचालक के. एस. वेंकटगिरी म्हणाले, “वालिया प्रकल्पात गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडने सुरु ठेवलेल्या सातत्यपूर्ण आणि सच्च्या प्रयत्नांचे फलित म्हणून त्यांनी हे ग्रीनको मानांकन प्राप्त केलेले आहे. परिवर्तनीय उर्जेपासून ते नवीन तंत्रज्ञान स्थापित करण्यापर्यंतच्या अष्टपैलू कामगिरीमुळे जीआयएल वालिया प्रकल्पाचे देखील गोदरेज समूहाच्या जोडीने वर्ष २०२६ पर्यंत कार्बन तटस्थता, जल तटस्थता आणि कचरा डेपोमध्ये शून्य कचरा निर्मिती साध्य करण्याचे ध्येय निश्चित झालेले आहे. पुन्हा एकदा आम्ही अत्यंत आनंदाने गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड, वालिया यांचे आमच्या ग्रीनको परिवारात स्वागत करत आहोत.”

 

About Godrej Industries

Godrej Industries (Chemicals) is one of the oldest businesses of the Godrej Group, and is in the business of manufacturing oleo chemicals, derivatives and surfactants in India since 1963. Today, it is one of India’s leading oleochemicals players and exports to over 80 countries in North and South America, Asia, Europe, Australia, and Africa, etc

 

 

As a part of Godrej Good & Green, it is deeply committed to building a more inclusive and Greener India. In line with this, the company has made sustainability a key part of its manufacturing process and value chain. Its relentless focus on energy conservation has been consistently recognised by several industry bodies such as the Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI), Indian Chemical Council (ICC) and Confederation of Indian Industry (CII). 

 

 

In 1990, Godrej Industries set up their flagship manufacturing facility at Valia in Gujarat spread across 140 acres. This integrated manufacturing plant is ISO 50001:2018, ISO 9001:2015, ISO 14001:2015, and ISO 45001:2018 certified, and all products manufactured are Kosher certified. The business has another manufacturing facility in Ambernath, Maharashtra which is also ISO 9001:2015, ISO 14001:2015 and ISO 45001:2018 certified.

 

 

Both of the facilities have earned several industry honours and accolades for its Green initiatives.


Tags: GODREJ INDUSTRIESGreenCo Platinum Ratingगोदरेज इंडस्ट्रीज
Previous Post

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

Next Post

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे कार्य गतीने असल्याचा केंद्राचा दावा! पण सात वर्षे काय झाले?

Next Post
marathi

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे कार्य गतीने असल्याचा केंद्राचा दावा! पण सात वर्षे काय झाले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!