मुक्तपीठ टीम
बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपालांविरोधातील सुनावणी पुन्हा घ्यावी, अशी मागणी गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे केली आहे. याचिकेत सरकारने सत्र न्यायालयाने लैंगिक अत्याचारानंतर पीडित महिलेवर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेतली नाही. तसेच तिच्या चारित्र्याचाही पंचनामा करण्यात आल्याचे सांगितले आहे.
सरकारचा सुनावणीवरील आक्षेपाचे मुद्दे
• सरकारचे म्हणणे आहे की ट्रायल कोर्टाने केवळ बचाव पक्षाच्या वकिलांनी सादर केलेले पुरावे खरे मानले.
• परंतु पीडिता आणि फिर्यादीच्या साक्षीदारांच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केले.
• सरकारचा असा दावा आहे की न्यायालयाने या प्रकरणातील सर्वात महत्वाच्या वस्तुस्थितीकडेही दुर्लक्ष केले.
• आरोपीचा माफीनामा ई-मेलमधून आरोपीचा गुन्हा स्पष्टपणे दिसून येतो, तेथे दुर्लक्ष करण्यात आले.
तेजपालांच्या बलात्कार प्रकरणातील घटनाक्रम
• नोव्हेंबर २०१३ मध्ये एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका सहकारी महिलेवर बलात्काराचा आरोप तेजपाल यांच्यावर करण्यात आला होता.
• २१ मे रोजी सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली.
• राज्य सरकारतर्फे काल दुरुस्ती याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली.
• न्यायालयीन छाननी व्हायला हवी, गोवा सरकारची मागणी
• पीडित महिलेवरील अत्याचाराच्या बाबतीत ज्या पद्धतीने पुरावे नोंदीवर घेतले त्याची न्यायालयीन छाननी व्हायला हवी, अशी मागणी गोवा सरकारने केली आहे.
• उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा आदेश रेकॉर्डवर आणावा, अशी विनंती करताना निर्दोषत्वाचा आदेश चुकीचा आहे असे सांगितले.
न्यायालयीन लढाई कशी झाली?
• हे प्रकरण गोव्याच्या मापुसाच्या सत्र न्यायालयात चालले होते.
• अडीच वर्षांच्या या प्रकरणात अतिरिक्त न्यायाधीश क्षमा जोशी यांनी गेल्या महिन्यात निकाल रोखून ठेवला होता.
• तेजपाल यांच्या मागणीनुसार बंद कक्षात या प्रकरणाची सुनावणी झाली.
• या प्रकरणात विशेष सरकारी वकील फ्रान्सिस्को टाव्होरा यांनी गोवा पोलिसांची बाजू मांडली.
• दुसरीकडे, वकील राजीव गोमेझ आणि आमिर खान यांनी तेजपाल यांची न्यायालयात बाजू मांडली.