मुक्तपीठ टीम
गोव्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दुचाकी वाहन चालविण्यास बंदी घातली आहे. शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी काढलेल्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांना दुचाकी चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारण त्यांच्यापैकी अनेक बेपर्वाईने दुचाकी चालवत असत.
आमोणकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, “बरेच विद्यार्थी दुचाकीचा वापर करतात, अशी माहिती मिळाली आहे. तसेच त्यांच्यातील अनेक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात, अशा तक्रारीही आहेत.”
“पीटीएच्या बैठकीत सर्व संस्थांच्या प्रमुखांनी या विषयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोणतेही विद्यार्थी शाळांमध्ये दुचाकी वाहने चालविणार नाहीत याची काळजी घेणे, ही शाळेची जबाबदारी असेल,” असेही या आदेशात म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ: