Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी जागतिक ठराव, भारताच्या प्रयत्नांना १७५ देशांची साथ!

March 4, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Plastic Pollution

मुक्तपीठ टीम

प्लास्टिक प्रदूषण पर्यावरणासमोरचे जागतिक आव्हान म्हणून ओळखले जाते. या आव्हानाला तोंड देण्यासाठी महत्वाची पावलं उचलण्यावर जागितक प्रयत्न सुरु असतात. नैरोबी येथे आयोजित संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेच्या पाचव्या सत्रातही तसे प्रयत्न झाले. प्लास्टिक प्रदूषणाबाबत तीन मसुदा ठरावांचा विचार करण्यात आला. विचाराधीन मसुदा ठरावांपैकी एक भारताचा होता. भारताने सादर केलेल्या ठरावाच्या मसुद्यामध्ये सदस्य देशांनी त्वरित सामूहिक कृती स्वेच्छेने करण्याचे आवाहन केले होते. त्याला १७५ देशांनी साथ दिली. त्यामुळे आता प्लास्टिक पॅकेजिंगवर ईपीआरद्वारे उपाय तसेच एकदाच-वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालणे अशी पावलं इतरही अनेक देश उचलतील. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

HISTORIC STEP at UNEA 5.2

175 nations endorse a resolution to #BeatPlasticPollution and forge an international legally binding agreement by 2024.

Under the leadership of our PM Shri @NarendraModi ji, India has already taken resolute steps to address plastic pollution.

— Bhupender Yadav (@byadavbjp) March 2, 2022


नवीन आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक करारासाठी आंतर-सरकारी वाटाघाटी समितीची स्थापना करून प्लास्टिक प्रदूषणावर जागतिक पावले उचलण्याच्या ठरावावर सहमती करण्यासाठी भारताने सर्व सदस्य राष्ट्रांशी संवादात सहभाग घेतला.
१७५ देशांनी स्वीकारलेला हा ठराव, ऐतिहासिक असल्याचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ठोस आणि प्रभावीपणे प्लास्टिक प्रदूषण संपवण्याचा प्रवास सुरू केला आहे.

 

भारताच्या आग्रहास्तव, प्लास्टिक प्रदूषणावर उपाययोजना करताना राष्ट्रीय परिस्थिती आणि क्षमता हे तत्त्व विकसनशील देशांना त्यांच्या विकासाच्या मार्गावर चालण्याची परवानगी देण्यासाठी ठरावाच्या मजकुरात समाविष्ट केले गेले.

 

या टप्प्यावर, समितीच्या विचारविनिमयाच्या निकालाचा अंदाज घेत, उद्दिष्ट, व्याख्या, स्वरूपे आणि पद्धती विकसित करून आंतर-सरकारी वाटाघाटी समितीला अनिवार्य न करण्याबाबत भारताने भूमिका मांडली. प्लास्टिक प्रदूषणाला तात्काळ आणि निरंतर आधारावर त्यावर उपाययोजना करण्यासाठी देशांद्वारे तत्काळ सामूहिक स्वयंसेवी कृतींची तरतूद देखील समाविष्ट करण्यात आली होती.

 

प्रदीर्घ वाटाघाटीनंतर, २ मार्च २०२२ रोजी संपलेल्या यूएनईएच्या पाचव्या सत्रात स्वीकारल्या गेलेल्या “प्लास्टिक प्रदूषणाचा अंत: आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक साधनाकडे” या ठरावात भारताच्या मसुद्याच्या ठरावातील प्रमुख उद्दिष्टे पुरेशी समाविष्ट करण्यात आली. राष्ट्रीय परिस्थिती आणि क्षमतांचा आदर करत सामूहिक जागतिक कृतीसाठी सहमती दिल्याबद्दल हे सत्र लक्षात ठेवले जाईल.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Climate Change Minister Bhupendra Yadavglobal challengeGlobal Pollution Prevention Resolutiongood newsIndiamuktpeethPlastic PollutionThe environmentचांगली बातमीजागतिक आव्हानपर्यावरणप्रदूषण रोखणे जागतिक ठरावप्लास्टिक प्रदूषणभारतमुक्तपीठहवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव
Previous Post

वारांगनांना पत्त्याच्या पुराव्याविना आधारकार्ड, सर्वोच्च न्यायालयात यूआयडीएआयची माहिती

Next Post

भारतीय हवाई दलाचे धोरणात्मक नियोजन, पोखरणच्या ‘वायुशक्ती’ सरावात राफेलही!

Next Post
Rafale

भारतीय हवाई दलाचे धोरणात्मक नियोजन, पोखरणच्या 'वायुशक्ती’ सरावात राफेलही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!