मुक्तपीठ टीम
जागतिक दर्जाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची आणि दादर या दोन महत्वाच्या स्थानकांच्या पुनर्विकासाची गाडी ‘अखेर ’ हलणार आहे. शुक्रवारी, २४ डिसेंबर रोजी मुंबई हेरिटेज संवर्धन समिती आणि मुंबई महापालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी या साईटना भेट देणे अपेक्षित आहे.
भारतीय रेल्वे ‘सीएसएमटी’च्या पुनर्विकासानंतर ‘बाय-बॅक’ करणार आहे. पुर्नवसनासाठी रेल्वेने आर्थिक मॉडेल सार्वजनिक-खाजगी सहभागावरून (पीपीपी) हायब्रिड मॉडेलमध्ये बदलले आहे. त्यामुळे खाजगी विकासक सीएसएमटीच्या विकासासाठी ठेवलेल्या निधीची परतफेड करणार आहेत. या हायब्रिड मॉडेलमुळे सीएसएमटी आणि दादर या बऱ्याच वर्षांचा इतिहास असलेल्या स्थानकांचा पुनर्विकास होईल. दरम्यान, दादर स्थानकाचे नूतनीकरण करण्याची विस्तृत योजना मध्य रेल्वेने आखली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
‘इंडियन रेल्वे स्टेशनस् डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (आयआरएसडीसी) पुनर्विकासासाठी आॅगस्ट २०२० मध्ये ‘आरएफक्यु’ मागवल्यानंतर ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अप्रायझल कमिटीने ’ १५ जानेवारी २०२१रोजी या पुनर्विकास प्रकल्पाला मंजूरी दिली. मुंबईसह सर्वत्र कोविडचा प्रसार झाला असूनही, या पुनर्विकासासाठी १० विकासकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. १० विकासकांच्या अर्जांची कसून छाननी केल्यानंतर , फक्त एका विकासकाचा अर्ज फेटाळून नऊ जणांच्या अर्जांना पुढील कामांसाठी मंजूरी देण्यात आली.
पुनर्विकासासाठी विकासकांसाठी घेतलेले महत्वाचे निकष
- आरएलडीएच्या सुचना आणि निकषांनुसारच पुनर्विकास करणे बंधनकारक आहे. या पुनर्विकासासाठी एकूण १ हजार ५३० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
- हेरिटेज दर्जा आहे तसाच राहिला पाहिजे.. हेरिटेज स्वेअरचे दर्जा राखणे, उत्तरेकडे नुतनीकरण झाल्यानंतर नवीन हेरिटेज त्याला जोडले पाहिजे, क्रॉफर्ड मार्केटच्या दिेशेने नवीन प्रवेशद्वार असायला हवा, पी. डिमेलो रोेडच्या बाजूला हार्बर गाड्यांच्या मार्गिकांचे स्थानांतरण करावा आणि विविधोपयोगी एकत्रीकरण असावे, असे महत्वाचे निकष मध्य रेल्वेने विकासकांसाठी तयार केले आहेत.
- तब्बल २.५४ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचा व्यावसायिक विकास (कमर्शियल डेव्हलपमेंट) करता येईल.
- आर्थिक मंत्रालय, विधी मंत्रालय, निती आयोग, रेल्वे मंत्रालय यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच ‘हायब्रिड मॉडेल’ ‘वापरा आणि हस्तांतर’तत्वावर करावे.
- प्रवाशांना चांगली सेवा देण्याकरीता संबंधित ठेकेदारांना २७ वर्षांच्या तत्वावर परवाना देण्यात येईल.