मानही न वळवता मागचं दाखवणाऱ्या चष्म्याचा भारतात शोध लावला आहे. सर्वात कौतुकास्पद बाब अशी की हा शोध बारावीच्या विद्यार्थिनीनं लावलाय. विशेष म्हणजे या शोधासाठी तिला फक्त शंभर रुपयांचा खर्च आला आहे.
कोलकात्यात बारावीत शिकणारी दिगंतिका बोसने हा एक अनोखा चष्मा तयार केला आहे. हा चष्मा घातला की मानही न वळवता मागचं दुष्य पाहणं शक्य आहे. या विद्यार्थीनीच्या या दिव्यदृष्टी चष्म्याच्या शोधाबद्दल कौतुक केलं जातंय. तिनं चष्म्याच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.
तथापि, नेत्ररोग तज्ज्ञांनी सांगितले की, अशा कोणत्याही चष्माचा वापर करण्यापूर्वी एक चाचणी घ्यावी लागेल. दिगंतिकानं आपण केवळ कल्पनाशक्तीच्या बळावर या चष्म्याचा शोध लावलाय.
दिगंतिकाने मान न वळवता मागचं दाखवण्यासाठी चष्म्याच्या फ्रेमला दोन अतिरिक्त लेन्स बसवल्या आहेत. ते डिझाइन तयार करण्यासाठी तिला फक्त १०० रुपये खर्च आला आहे. ‘दिगंतिकाने बनवलेल्या चष्म्याचा उपयोग जंगलात प्रवास करताना होऊ शकतो.
दिगंतिकाने सांगितले की, ती सुंदरबन येथे गेली होती. बरेच लोक तिथे वावरणारऱ्या वाघाच्या दहशतीबद्दल बोलत होते. मागून वाघाने हल्ला केला तर काय होईल? तर या समस्येवर तोडगा काढण्याच्या उद्दशाने तिने हा चष्मा बनवला आहे.