एकीकडे शिक्षक रणजीतसिंह डिसले तर दुसरीकडे एक भारतीय वंशाच्या १५ वर्षीय मुलीनेही जागतिक स्तरावर भारताचा डंका वाजवलाय. गीतांजली रावला टाइम मासिकाने ‘फस्ट किड ऑफ द इयर’ या किताबाने सन्मानित केले आहे. सध्या अमेरिकन नागरिक असलेल्या या गीताजंलीच्या शानदार कार्याबद्दल पाच हजार मुलांमधून तिला निवडण्यात आलंय. टाइम मासिकाने आपल्या कव्हर पेजवर गीतांजलीला जागा दिली आहे. गीतांजली राव ही एक वैज्ञानिक आणि इनोव्हेटर म्हणून ओळखली जाते.
टाइम मासिकांनं पहिल्यांदाच किड ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकनं मागवली होती. यासाठी पाच हजार नामांकनं आली होती. गीतांजलीला नुकताच अमेरिकेच्या टॉप यंग साइंटिस्टचा पुरस्कार मिळाला होता.
गीतांजली हिने एक सेंसर बनवले आहे, ज्यामध्ये पाण्यातील लेडचे प्रमाण अत्यंत सहजपणे कळू शकणार आहे. त्याचसोबत या सेंसरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणतेही महागड्या डिवाइसचा वापर करण्यात आलेला नाही. हे डिवाइस मोबाईल सारखे दिसते. याचे नाव गीतांजलीने ‘टेथिस’ असे ठेवले आहे. गीतांजलीच्या सेंसरवर अमेरिकेतील वैज्ञानिक काम करत आहेत.