मुक्तपीठ टीम
संरक्षण संपदा दिन २०२१ चे औचित्य साधून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छावणी मंडळाअंतर्गत येणाऱ्या नागरिकांसाठी जीआयएस आधारित स्वयंचलित पाणी पुरवठा प्रणालीचे नुकतेच उद्घाटन केले. संरक्षण सचिव आणि दिल्ली इथल्या संरक्षण संपदा महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली, भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स (बिसाग) ने, पाणीपुरवठ्यासाठी हे जीआयएस आधारित मोड्यूल विकसित केले आहे.
छावणी परिसरातल्या नागरिकांना सुलभ आणि वेगवान जल जोडण्या देण्यासाठी हे उपयुक्त आहे. हे संपूर्णतः स्वयंचलित असून,
1. पाणीपुरवठा जोडणीचे स्थान ओळखण्याची सुविधा नागरिकांना प्रदान करते.
2. जवळची जलवाहिनी ते स्वतः निश्चित करते.
3. सर्व पाणीपुरवठा वाहिन्यांची क्षमता विषद करण्यात आली आहे.
4. स्थानाच्या आधारे हे अंतराची गणना करते.
5. अर्जदाराकडून जोडणी शुल्कासह देय असलेले इतर आकार ऑनलाईन देता येतात.
- याशिवाय हे मोड्यूल जल जोडणीची परवानगी ऑनलाईन देण्याची सुविधाही प्रदान करते. ही प्रणाली वापरकर्त्यासाठी सुलभ, प्रभावी आणि पारदर्शक आहे.
- जीआयएस प्रणाली ही देशातली अशा प्रकारची पहिली प्रणाली आहे. जल जोडणीच्या मंजुरीसाठी यामध्ये मानवी हस्तक्षेप नसल्याने किमान सरकार आणि कमाल प्रशासन या संकल्पनेवर आधारित ही प्रणाली आहे.
- बिसागने जीआयएस मोड्यूलची यशस्वी अंमलबजावणी केली असून भारत इलेक्ट्रोनिक्सने हे ई छावणी पोर्टल समवेत एकीकृत केले आहे.
- संरक्षण संपदा महासंचालकाद्वारे १६ डिसेंबर २०२१ ला संरक्षण संपदा दिन साजरा करण्यात आला.