Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

खेलो इंडिया युथ गेम्स २०२२: बॅडमिंटनमध्ये पहिल्या विजयाचे दर्शन, कबड्डीत मुलींची दमदार आगेकूच!

June 5, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Khelo India Youth Games 2022

मुक्तपीठ टीम

पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये बॅडमिंटनच्या मुलांच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला विजयाचे दर्शन घडले. दर्शन पुजारी याने तामीळनाडूच्या थांगम कविन याचा दोन सेटमध्ये पराभव केला. उद्या त्याचा सामना उत्तराखंडच्या प्रणव शर्मासोबत होणार आहे.

ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समधील सुसज्ज बॅडमिंटन हॉलमध्ये हे सामने सुरू आहेत. स्पर्धेचा आज दुसरा दिवस होता.

दर्शन पुजारीने (मुंबई) सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. थांगम त्याचा अंदाज घेत होता. परंतु लगेच महाराष्ट्राच्या दर्शनने दोन गुण घेत चांगली सुरूवात केली. नंतर ही आघाडी त्याने वाढवत नेली. थांगमला त्याने डोके वर काढू दिले नाही. दर्शनने पहिला सेट (२१ विरूद्ध १०) जिंकून सामन्यात आघाडी घेतली. फोरहँड आणि बॅकहँड हे दोन्ही फटके तो लीलया मारत होता. खास करून त्याने स्मॅश जास्त मारले.

पहिला सामना हरलेला थांगम दबावाखालीच खेळत होता. त्यामुळे गुणफलक १९ विरूद्ध ७ असा झाला. काही चुकीचे फटके मारल्याने थांगमला गुण मिळाले. परंतु सरळ सेटमध्ये दर्शनने त्याचा पराभव केला. दोन्ही सेट त्याने २१ विरूद्ध १० आणि २१ विरूद्ध १० अशा फरकाने जिंकले.

हैदराबादला सराव

मुंबईचा रहिवासी असलेला दर्शन पुजारी हा हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीमध्ये सराव करतो. त्याच्याकडून महाराष्ट्राला पदकाची अपेक्षा आहे. सामन्यानंतर त्याने तसा निश्चय बोलून दाखवला.

कबड्डीत महाराष्ट्रातील मुलींची दमदार आगेकूच

पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाने आज (शनिवार) दुसऱ्या दिवशीही विजयी घोडदौड कायम ठेवली. छत्तीसगडच्या संघावर ६२ विरूद्ध १८ असा ४४ गुणांनी दणदणीत विजय मिळवित दिमाखात पुढची फेरी गाठली. या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडवर तब्बल पाच लोण चढवले.

ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे कबड्डी मैदान आजही महाराष्ट्राने गाजवले. ऋतुजा अवघडी, यशिका पुजारी आणि हरजीतकौर संधूने आजही धडाकेबाज खेळ केला. पहिल्या तीन मिनिटांत महाराष्ट्राच्या मुलींनी छत्तीसगडच्या संघाचा अंदाज घेतला. त्यानंतर आक्रमण सुरू केले. उत्कृष्ट पकडी आणि चढाई केल्याने गुणांची मोठी आघाडी घेता आली.

पहिल्या हाफमध्ये दोन आणि दुसऱ्या हाफमध्ये तीन असे पाच लोण महाराष्ट्राने छत्तीसगडवर चढवले. प्रत्येक चढाईत छत्तीसगडचे गडी बाद केले जात होते. पकडीही तितक्याच कौशल्याने होत होत्या. शेवटची दहा मिनिटे उरली असताना गुणफलक होता ४१ विरूद्ध १४ महाराष्ट्राने सुरूवातीपासून सामन्यावर मजबूत पकड ठेवली होती. परिणामी हा सामना एकतर्फी झाला. संघाने आज चढाईत सर्वाधिक गुण मिळवले. उद्या (रविवारी) आंध्र प्रदेशसोबत लढत होणार आहे.

चमकदार खेळ

हरजीतकौर (१३ गुण), मनिषा राठोड (१२) यांनी चढाईत कमाल केली. डिफेन्समध्ये कोमल ससाणे (५), यशिका पुजारी (७), शिवरजनी पाटील (४), ऋतुजा अवघडी (३), निकिता लंगोटे (२), मुस्कान लोखंडे (२), किरण तोडकर (२) यांनीही गुण मिळवित संघाला विजय मिळवून दिला. अनुजा शिंदे आणि हर्षदा पाटील या आज राखीवमध्ये होत्या.


Tags: Badmintongood newskabaddiKhelo India Youth Games 2022muktpeethकबड्डीखेलो इंडिया युथ गेम्स 2022चांगली बातमीबॅडमिंटनमुक्तपीठ
Previous Post

खेलो इंडिया युथ गेम्स 2022: महाराष्ट्राला गतकामध्ये पहिलं कांस्य पदक! मराठवाड्याच्या चार लेकींची कामगिरी!!

Next Post

महाराष्ट्र ज्ञान महामंडळात ‘प्रोजेक्ट ट्रेनी’ पदावर करिअर संधी

Next Post
mkcl

महाराष्ट्र ज्ञान महामंडळात ‘प्रोजेक्ट ट्रेनी’ पदावर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!