मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने तिचा हिजाब नीट करत असताना त्याची सेफ्टी पिन चुकून गिळली. या मुलीने दातांमध्ये ही सेफ्टी पिन पकडली होती. सहावीत शिकणारी ही मुलगी इतरांप्रमाणे हिजाब सेफ्टी पिनने लावत होती, मात्र दुर्दैवाने सेफ्टी पिन तिच्या विंडपाइपमध्ये अडकली असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या आई-वडिलांना ही घटना कळताच त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांना अथक प्रयत्नानंतर तिचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
सेफ्टी पिन गिळल्याचे कळताच, रूग्णालयात उपचारासाठी दाखल!
- मुलगी तिच्या शाळेत असताना ही घटना घडली.
- दुपारी मधल्या सुट्टीत मुलीने तिचा हिजाब ठिक करण्यासाठी पिन काढली.
- घरातील वडिलधाऱ्यांच्या पद्धतीचं अनुकरण करत तिने ती पिन दातांनी धरली आणि मग चुकून ती पिन गिळली.
- पिन गिळल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं.
- घटनेची माहिती मिळताच तिच्या पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
- रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
नॉन-इनवेसिव्ह ब्रॉन्कोस्कोपी शस्त्रक्रिया ठरली यशस्वी!
- अल्पवयीन मुलीला नागपूरच्या आयजीजीएमसीएचच्या ईएनटी विभागात नेण्यात आले, जिथे क्ष-किरणाने मुलीच्या विंडपाइपमध्ये पिन अडकल्याचे उघड झाले.
- त्यानंतर डॉक्टरांनी नॉन-इनवेसिव्ह ब्रॉन्कोस्कोपी केली आणि पिन काढली.
- शस्त्रक्रियेनंतर पीडितेला २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आणि तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.
विशेष म्हणजे, पिन यशस्वीरित्या काढून टाकल्यानंतर, डॉक्टरांनी महिला आणि मुलींना सावध केले आहे की साडी किंवा हिजाब परिधान करताना पिन दात किंवा ओठांनी धरण्याची सवय घातक ठरू शकते. कृपया चुकूनही अशी चूक करू नका.