मुक्तपीठ टीम
दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या पदवी महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी जिओ-फेन्सिंग हजेरी सिस्टम लागू केली जाईल. उच्च शिक्षण विभाग लवकरच, हे पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करणार आहे. भविष्यात ही सिस्टम संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व दुर्गम भागात अशी पदवी महाविद्यालये आहेत, जिथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे आकडे फारच कमी आहेत. महिन्यातील काही दिवस शिक्षक आपली हजेरी पूर्ण करतात. ही समस्या सोडविण्यासाठी जिओ फेन्सिंग हजेरी सिस्टम राबविण्याची तयारी सुरू होणार आहे.
जिओचे फेन्सिंग सिस्टम आणण्यासाठी उच्च शिक्षण विभाग घेणार पुढाकार!
- माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने उच्च शिक्षण विभाग जिओ फेन्सिंग सिस्टमच्या दिशेने काम करणार आहे.
- याअंतर्गत, जो कोणी शिक्षक किंवा विद्यार्थी कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश करेल, त्यांची हजेरी त्याच्या मोबाईलवरूनच घेतली जाईल.
- त्यासाठी मोबाईल जिओ फेन्सिंगच्या कक्षेत येणे आवश्यक आहे.
जिओ फेन्सिंग पायलट प्रोजेक्ट म्हणून डोंगराळ भागातील काही पदवी महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास सर्व महाविद्यालयांमध्ये हे सुरू करण्यात येईल. यापूर्वी परिवहन महामंडळाने आपल्या सर्व बसस्थानकांवर त्याची अंमलबजावणी केली असून, त्याअंतर्गत बसस्थानकांचे जिओ फेन्सिंग करण्यात आले आहे.
जिओ फेन्सिंग म्हणजे काय?
- ही एक सॅटेलाइट आधारित सिस्टम आहे, ज्यामध्ये विशिष्ट क्षेत्राचे जिओ फेन्सिंग केले जाते.
- या रेंजमध्ये कोणतेही उपकरण आले तरी ते रेकॉर्डमध्ये येईल.
- जिओ फेन्सिंग संबंधित अॅप तेव्हाच काम करेल ज्यावेळी तो त्याच्या अवतीभोवती असेल.
- जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक मोबाईल घेऊन कॅम्पसमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना त्यात डाउनलोड केलेला हजेरी अॅप उघडावा लागेल.
- हे अॅप फक्त कॉलेजमध्ये म्हणजेच जिओ फेन्सिंगभोवतीच काम करेल.
- हे अॅप उघडल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
- विद्यार्थी आणि शिक्षक त्या कॅम्पसमधून बाहेर पडताच त्यांचे रेकॉर्ड आपोआप अपडेट होतील.