जनरल महत्वाच्या : १)कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या लक्षणात अनेक बदल दिसून येत असल्याने उपचार करताना अनेक अडचणी समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेतील कोरोना अधिक घातक ठरत असल्याने कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस कोरोनाच्या प्रारंभिक लक्षणात सर्दी, ताप, खोकला आला की कोरोनाची ही प्रमुख लक्षणे मानली जायची. आणि त्यानुसार चाचणी करून डॉक्टर उपचार करत. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या विषाणूंमध्ये अनेक बदल दिसून येत आहेत. त्यानुसार रुग्णांना विविध प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी,अशक्तपणा, जुलाब, चव जाणे, डोकेदुखी इत्यादी प्रकारची नवी लक्षणे दिसून येत आहेत. २) मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणांसोबतच आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या कमी झाली नाही, तर कडक निर्बंध करण्यासोबतच लॉकडाऊनचाही इशारा देण्यात आला आहे. नागरिकांकडून वारंवार कोरोना नियमांची पायमल्ली होत असताना आता प्रशासन मात्र कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, हेच स्पष्ट होत आहे. ३) महिन्यात २५ फेब्रुवारीला, हे महागडे औषध अमेरिकेतून रुग्णालयात पोहचले हे औषध देण्याचा परवाना हिंदुजा रुग्णालयाकडे आहे. शुक्रवारी २६ फेब्रुवारी रोजी हे औषध तीराला सलाईन मार्फत देण्यात आले असून एक दिवस तिला रुग्णालयात देखरेखी खाली ठेवण्यात येईल आणि शनिवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. अशा पद्धतीने या आजारांवर औषध मिळणारी तीरा मुंबईतील दुसरे मूल असून यापूर्वी अशाच स्वरूपाचे इंजेक्शन एका बाळाला महिन्यापूर्वीच याच रुग्णालयात देण्यात आले आहे. ४) मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे आधीच हैराण असलेले नागरिकांना आता उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मुंबई शहरासह, नाशिक, सोलापूर, अकोला, सिधुदुर्ग, रत्नागिरीत उकाडा वाढला आहे. पुढच्या काही दिवसांत उष्णता आणखी वाढणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ५) राज्यात ११ मार्चला हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून १४ मार्चला ठरलेल्या तारखेला एमपीएससीची परीक्षा घेण्यात यावी या मागणी केली होती. यावेळी पुण्यात विद्यार्थ्यांनी जोपर्यंत परीक्षा १४ मार्चला होतील हे सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हलणार नाहीत असा निर्णय घेतला होता. त्यावेळी कोरोना काळात एकत्र येण्यास बंदी असताना देखील विद्यार्थी रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरून आंदोलन केले त्यामुळे शासनाने लागू केलेल्या नियमांची पायमल्ली झाली आहे. हे कारण समोर करत राज्यभरात हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून परीक्षा २१ मार्चला होणार असल्याची माहिती दिली होती. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्यांनतर २१ मार्चला एमपीएससीच्या परीक्षा सुरळीत पार देखील पडल्या. परंतु यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. याबाबत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली.