जनरल बातम्या : 1) टाटा मोटर्स कंपनीने रुग्णांची वाहतूक करणारी मॅजिक एक्स्प्रेस नावाची अँब्युलन्स लॉन्च केली आहे. कोरोना साथीच्या काळात या सेवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्यामुळेच रुग्ण आणि सहाय्यकांना पुरेशी जागा, सुरक्षितता व आराम पुरवण्याच्या दृष्टीने हे वाहन एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. इकोनॉमी अँब्युलन्स विभागातील आरोग्यसेवा वाहतुकीसाठी ही अँब्युलन्स खास डिझाइन करण्यात आली. ही मॅजिक एक्स्प्रेस अँब्युलन्स वैद्यकीय व आरोग्याशी संबंधित सेवांना सहाय्य करण्यासाठी तयार केली आहे.ही अँब्युलन्स एआयएस १२५ नियमांचेही पूर्णपणे पालन करते. 2)सध्या बाजारात सोने अधिक स्वस्त होत आहे आणि त्यामुळेच सराफा बाजारात ही सोन्याची मागणी वाढलेली दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत ५६३०० रुपयांवर पोहचली होती.सोने सध्या १२००० रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि २०२१ च्या वर्षात सोने ६००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) शुक्रवारी बाजार बंद झाला होता त्या वेळी सोन्याचा भाव ४४७८५ रुपयांवर बंद झाला होता. त्यामध्ये ९४ रुपयांची वाढ झाली होती. त्यापूर्वी सोन्याचा ४४२७१ रुपयांपर्यंत खाली आला होता. एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव ६६८९५ रुपये होता त्यात घसरण होवून ६५० रुपये किंमत झाली.आणि त्यामुळेच चांदीने ही ६५९३३ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. 3) कोराना लसीमुळे कोराना पुन्हा संपण्याच्या मार्गावर येत होता आणि यामुळेच सरकारने पुन्हा बंद पडलेल्या कामधंद्यांना काही अटी नियमंसोबत सुरुवात करण्यास परवानगी दिली होती.परंतु नियमांच्या उल्लंघनामुळे कोरोनाच प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला.मध्य प्रदेशातही गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येत आहे.आणि त्यामुळे प्रशासनानं निर्बंध कठीण करण्याचा निर्णय घेतलाय.राज्यातील इंदूर शहरातील जिल्हाधिकाऱ्यांनी तर मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात येईल, असे आदेश केले आहेत.