मुक्तपीठ टीम
तळीये दुर्घटना घडली त्याच डोंगराच्या दुसरीकडील भागाला देखील तीन किमी लांबीच्या भेगा पडल्या आहेत. या कड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिंदे आवड, कुम्हण अळी, खालचे आवाड, मधले आवाड आणि तळीये म्हणजेच कोंडाळकर आवाड अशा पाच वाड्यांना धोका आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णयाची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
तसेच, तळीये या गावातील ग्रामस्थांचे सुरक्षित जागी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच ६० घरांचे पुनर्वसन नवीन जागी केलं जाणार आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आणलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यासाठी शिंदे यांनी तळीयेला पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी त्यांनी महाड सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचीही घोषणा केली.
महाडमध्ये झालेल्या प्रलयंकारी पावसामुळे तळीये गावात दरड कोसळून त्यात ८५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता. पुण्यातील आंबेगाव येथील माळीण गावाप्रमाणेच तळीयेचे देखील लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची मागणी होत होती.
तळीये दुर्घटना घडली त्याच डोंगराच्या दुसरीकडील भागाला देखील भेगा पडल्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी शिंदे यांना दिली. ही भेग तीन किलोमीटर पर्यंत लांब असल्याने या कड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिंदे आवड, कुम्हण अळी, खालचे आवाड, मधले आवाड आणि तळीये म्हणजेच कोंडाळकर आवाड अशा पाच वाड्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नक्की सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
महाड कोर्टाच्या दुरुस्तीसाठी ५० लाखांचा निधी
महाड मधील सत्र न्यायालयाच्या इमारतीचे देखील या पुरात अतोनात नुकसान झाले आहे. पुरामुळे नदीलगतची कोर्टाची इमारत पाण्याखाली गेल्याने आतील दालने व फर्निचरचे नुकसान झाले आहे. कोर्टातील कागदपत्रेही पाण्याखाली गेली होती. शिंदे यांनी शनिवारी या इमारतीला भेट देऊन पाहाणी केली. खराब झालेल्या गोष्टींची लवकरात लवकर दुरुस्ती करून इमारतीतून कामकाजाला पुन्हा सुरुवात व्हावी, यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली.
तळीये या गावातील ग्रामस्थांचे सुरक्षित जागी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच ६० घरांचे पुनर्वसन नवीन जागी केलं जाईल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आणलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यासाठी शिंदे यांनी तळीयेला पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी त्यांनी महाड सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचीही घोषणा केली.