मुक्तपीठ टीम
गणेशोत्सवात सगळीकडेच भक्तिमय वातावरण असते. कोरोना प्रादुर्भाव आणि निर्बंधांमुळे गेल्या वर्षी आणि यावर्षी देखील आपण एकमेकांच्या घरी जाऊन दर्शन घेणे थोडे कठीण आहे. आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक आणि घरगुती पद्धतीने मोठ्या श्रद्धेने गणेशाची पूजा केली जाते. अनेक जण आपल्या घरात गणपतीची खूप सुंदर आरास आणि सजावट करतात. गेली अनेक वर्षे विविध संस्था पुढाकार घेऊन घरगुती सजावट स्पर्धांचे आयोजन करून हौशी गणेशभक्तांचे कौतुक करीत आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या गामा फाऊंडेशनने देखील या वर्षी अशीच स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले असून महाराष्ट्रातील गणेश हौशी गणेश भक्तांच्या पाठीशी कौतुकाची थाप देण्यासाठी सज्ज झाली आहे.
आपल्याकडे सध्या निर्बंध जरी शिथिल झाले असले तरीही अजूनही धोका संपूर्ण टळलेला नाही, त्यामुळे या वर्षी आपण ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित करीत आहोत. ही स्पर्धा खालील प्रमाणे असेल.
- ही स्पर्धा फक्त घरगुती गणेशोत्सवा करीता आहे.
- सजावट साहित्य पर्यावरणपूरक असावे. थर्माकॉल, प्लास्टिक इत्यादी सारख्या पर्यावरणास घोकादायक वस्तूंचा वापर नसावा.
- आपल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचा फोटो व त्याबाबत थोडक्यात माहिती असे आम्हाला खालील email वर pdf स्वरूपात पाठवावे व त्यात आपले संपूर्ण नाव, पत्ता तसेच शहराचे नाव, संपर्क क्रमांक (फोन नं.) व इमेल आयडी सुद्धा नमूद करावे.
- एका घरातून एकच व्यक्ती सहभागी होऊ शकते.
या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख – शनिवार दि. १८/०९/२०२१ असून सजावटीचे फोटो व माहिती gamafoundation.mumbai@gmail.com या येथे पीडीएफ(pdf) स्वरूपात ईमेलवर पाठवावी.
अंतिम फेरीत ६ स्पर्धक असतील, यातून ४ पारितोषिके दिली जातील:
- प्रथम पारितोषिकं — ७५१/-
- द्वितीय पारितोषिकं — ५५१/-
- तृतीय पारितोषिकं — २५१/-
- उत्तेजनार्थ पारितोषिकं — १५१/-
अंतिम फेरी शनिवार २५/०९/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता झूम मिटींग द्वारे होईल. यामध्ये स्पर्धकांना परीक्षक काही प्रश्न विचारतील आणि नंतर निकाल जाहीर केला जाईल.
अधिक माहिती करीता संपर्क:
भूषण शितूत 9821154796 आणि
महेश कालेकर 9769348413
Email -gamafoundation.mumbai@gmail.com