मुक्तपीठ टीम
केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातील निवडणूक याचिकेचं प्रकरण तसंच कायम राहणार आहे. गडकरींनी त्यांच्याविरोधातील निवडणूक याचिका फेटाळण्याची विनंती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे केली होती. खंडपीठाने ती फेटाळून लावली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी हा निकाल दिला आहे. न्यायालयाने मोहम्मद नफीस खान यांनी दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरवण्याची गडकरींची मागणी फेटाळून लावत म्हटले आहे की, गडकरींविरोधातील याचिकेत काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्यावर विस्तारानं सुनावणी आवश्यक आहे.
गडकरींविरोधातील निवडणूक याचिकेत नेमकं काय?
• नितीन गडकरी हे सध्या महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत आणि केंद्रातील मोदी सरकारमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत.
• नागपूर येथील रहिवासी मोहम्मद नफीस खान यांनी गडकरींविरोधात निवडणूक याचिका दाखल केली आहे.
• हे प्रकरण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांच्या विरोधात दाखल झालेल्या निवडणूक याचिकेशी संबंधित आहे.
• नितीन गडकरी यांनी निवडणूक अर्जात चुकीची माहिती दिली असा आरोप करण्यात आला आहे.
• मतदारांची दिशाभूल केल्यामुळे गडकरींची लोकसभा सदस्य म्हणून झालेली निवड रद्द करावी, अशी विनंती याचिकेत केली आहे.