मुक्तपीठ टीम
कोरोनाचा संकटकाळ. सुरक्षा नियमांची बंधनं. पण मनातील भक्तीला येणारं उधाण तसंच. आता फक्त नियम पाळायचे असल्यानं गणरायाचे भक्त बाप्पाच्या भक्तीसाठी वेगवेगळे मार्ग वापरत आहेत. पुणे जिल्ह्यातील वडगावच्या गणेशभक्त कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून बाप्पाला कलावंदना दिली आहे.
वडगावातल्या गणेशोत्सवात काही तरी वेगळं करायचं ठरवण्यात आलं. त्यातून मग कल्पना पुढे आली ती मुंबईतील लालबागच्या राजाला गावात साकारायचं. आता तसं साकारायचं म्हटलं तरी कोरोना काळात काही सोपं नाही. पण गावातील तरुण कलाकारांनी ते कामही सोपं केलं. प्रथमेश पाटील आणि रचना गवळी यांनी ऐंशी चौरसफुटांची रांगोळी साकारली.
वडगावातील निवृत्ती नगरमधील आझाद मिञ मंडळ चौकसमोर लालबागच्या राजाच्या रांगोळी अवतारात दर्शन घेता येईल. १९ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री १० दर्शनाची व्यवस्था आहे. त्यासाठी अर्जुन गवळी यांच्याशी 9422321028 या क्रमांकावर संपर्क साधा.