तुळशीदास भोईटे/ सरळस्पष्ट विश्लेषण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मेगाफेरबदल झाले आहेत. त्यात महाराष्ट्रासाठी नेमकं काय विशेष आहे, त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. त्यातही महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार या तीन बाहेरून आलेल्या नेत्यांच्या तसेच भागवत कराडांच्या अनपेक्षित निवडीतून मोदी मंत्रिमंडळातील निवडीतून देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीचा प्रभाव स्पष्ट दिसत असल्याचे मानले जाते.
टीम नरेंद्र, विझन देवेंद्र!
• टीम नरेंद्रच्या महाराष्ट्रातून केलेल्या निवडीत देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव दिसत आहे.
• नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार हे तीनही नेते त्यांच्या पक्षातून देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत भाजपात आले होते.
हेही वाचा: मोदी सरकारचं सातवं वर्ष पूर्ण होणार, रिकाम्या जागा भरण्यासह फेरबदलांचीही शक्यता
नारायण राणे
• नारायण राणे हे मराठा आरक्षणासाठी खूप आक्रमक असतात. पण त्यांच्या जातीपेक्षा त्यांची राज्यातील मंत्रिमंडळ अनुभव, कर्तृत्व आणि शिवसेना विरोध हे निकष जास्त प्रभावी ठरले असावेत.
• कोकण पट्टा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
• त्यातील तळकोकणासह मुंबईत नारायण राणे हे मंत्रीपदाच्या पॉवर बुस्टरचा वापर करून शिवसेनेला जेरीस आणू शकतात.
• त्यामुळे एकतर शिवसेनेला एनडीएत भाजपाच्या अटींवर आणणे शक्य होऊ शकते.
• किंवा शिवसेना सोबत येत नसेल तर जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी राणे उपयोगी ठरतील.
कपिल पाटील
• कपिल पाटील हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मतदारसंघाचे खासदार आहेत.
• भाजपाने चलाखीने या पट्ट्यातील आगरी समाजाला शिवसेनेविरोधात अश्वस्थ करण्यासाठी विमानतळ नामकरणावर संघर्ष उभा करुन वापरला आहेच.
• त्याच्या पुढच्या टप्प्यात आता कपिल पाटलांना मंत्रीपदाचं बळ देत ठाणे-पालघर-रायगड पट्ट्यातील शिवसेनेच्या वर्चस्वाला हादरे देत कमी करण्याचा प्रयत्न असावा.
भारती पवार
• भारती पवारांमुळे उत्तर महाराष्ट्रासाठी एक प्रभावशाली राजकीय घराणं भाजपाचं बळ वाढवण्यासाठी वापरता येईलच.
• पुन्हा गावितांप्रमाणे वादग्रस्त नसेलेल्या सुशिक्षित आदिवासी नेतृत्वाला संधी देऊन आदिवासी समाजातही एक चांगला संदेश दिला गेला आहे.
• नाशिकच्या राजकारणाप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रात इतरत्रही भारती पवारांच्या निवडीचा फायदा मिळू शकेल.
हेही वाचा: ज्योतिरादित्य शिंदे मोदी सरकारमध्ये मंत्री बनण्याची शक्यता!
भागवत कराड
• भागवत कराड यांची मराठवाड्यातून केलेली निवड अनेकांसाठी धक्कादायक असली तरी तेथे पुन्हा देवेंद्र फडणवीसांची रणनीती दिसत आहे.
• गोपीनाथ मुंडेंप्रमाणेच पंकजा मुंडेंसाठीही कार्यकर्ता असल्यासारखे निष्ठेने काम करणाऱ्या कराडांना राज्यसभा सदस्यत्व देऊन फडणवीसांनी मोठी खेळी खेळली होती.
• आता त्यांना अनपेक्षितपणे मंत्रीपद देत पुन्हा वंजारी समाजाला सत्ता देत सन्मान दिल्याचा संदेश देतानाच त्या समाजातील मुंडेंच्या प्रस्थापित नेतृत्वाला पर्यायही तयार करण्याची खेळी असू शकत आहे.
महाराष्ट्राचे आधी सहा, आता आठ
1. नितीन गडकरी
2. पियूश गोयल
3. नारायण राणे
4. रावसाहेब दानवे
5. कपिल पाटील
6. भागवत कराड
7. भारती पवार
8. रामदास आठवले
दोघांचे राजीनामे
1. प्रकाश जावडेकर
2. संजय धोत्रे
तुळशीदास भोईटे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite
हेही वाचा: भाजपा बाहेरच्यांना संधी…कुंपणावरच्यांना संदेश! ‘कारभार-जात-उपरे आमचेच’ त्रिसुत्रीचा निवडीवर पगडा!
भाजपा बाहेरच्यांना संधी…कुंपणावरच्यांना संदेश! ‘कारभार-जात-उपरे आमचेच’ त्रिसुत्रीचा निवडीवर पगडा!