मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात दिवसेंदिवस साधूंवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. सांगलीमध्ये चार साधूंना ‘मुले चोरणारी टोळी’ समजून बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी घडली. सुदैवाने पालघरसारखी घटना होता-होता टळली असून पोलिसांनी हस्तक्षेप करुन साधूंची सर्व माहिती तपासून त्यांची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील असून हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरहुन जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते.
साधूंना लाठी-काठी आणि पट्टयाने मारहाण!!
- उत्तर प्रदेशातील चार साधू कर्नाटकातील विजापूरहून पंढरपूरच्या मंदिरात कारमधून जात असताना सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात ही घटना घडली.
- सोमवारी त्यांनी गावातील मंदिरात मुक्काम केला होता.
- एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी प्रवास सुरू करताना त्यांनी एका मुलाकडून दिशा मागितली.
- यामुळे काही स्थानिकांना ते मुलांचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा भाग असल्याचा संशय आला.
- यानंतर ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर साधू आणि ग्रामस्थांच्या मध्ये वादावादीचा प्रकार घडला.
- यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली.
- त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली.
- या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
याप्रकरणी कोणाची ही तक्रार दाखल झाली नाही!!
- या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती.
- त्यानंतर या साधूंकडे चौकशी केली असता,या साधूंच्याकडे मिळालेले आधार कार्ड आणि त्यानंतर संबंधित उत्तर प्रदेश मधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, हे सर्व मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखडयाचे साधू असल्याचं समोर आलं आणि खरे साधू असल्याचे स्पष्ट झाले.
- त्यानंतर या साधुनी मोठ्या मनाने ग्रामस्थांच्या विरोधात कोणतेही तक्रार नसून गैरसमजुरीतून हा प्रकार घडल्याचं पोलिसांना सांगितले.
- त्यामुळे या प्रकरणी कोणाची ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नाही
भाषा समजत नसल्याने स्थानिकांना संशय!!
वाटेत स्थानिक लोकांशी बोलत असताना एकमेकांची स्थानिक भाषा न समजल्यामुळे प्रकरण बिघडले आणि स्थानिक लोकांनी साधूंना मारहाण केली.
पालघरमधील मॉब लिचिंग!!
- पालघरमध्ये दोन साधूंची हत्या करण्यात आली होती.
- महाराष्ट्रातील साधूंवर अत्याचाराची ही पहिली घटना नाही.
- याआधीही २०२० मध्ये पालघरच्या गडचिंचले गावात जमावाने दोन साधूंना मुलं चोरण्याची टोळी समजून त्यांची हत्या केली होती.