Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारतातील आणखी चार स्थळे आंतरराष्ट्रीय महत्वाची पाणथळ ठिकाणे म्हणून रामसर यादीत

August 15, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
ramsar wetland

मुक्तपीठ टीम

भारतातील आणखी चार पाणथळ ठिकाणांना ‘रामसर ठिकाणे’ म्हणून रामसर कार्यालयाने मान्यता दिली आहे. गुजरातमधील थोल आणि वाधवाना तर हरियाणातील सुल्तानपूर आणि भिंडवास इथली ही स्थळे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्वीटद्वारे याची माहिती देत आनंद व्यक्त केला. पर्यावरणाबाबत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना विशेष आस्था आहे, त्यामुळे भारतात पाणथळ जागांच्या संवर्धनासंदर्भात एकूणच सुधारणा झाल्याचे ते म्हणाले.

ramsar wetland

भारतात आता ४६ रामसर स्थळे

• भारतात रामसर स्थळांची संख्या ४६ झाली आहे.
• या स्थळांद्वारे व्याप्त क्षेत्रफळ आता १,०८३,३२२ हेक्टर आहे.
• हरियाणात पहिल्या रामसर स्थळांची नोंद झाली.
• गुजरामधे २०१२ मध्ये घोषित झालेल्या नलसरोवरनंतर आणखी तीन जागांचा समावेश झाला आहे.

ramsar wetland

रामसर यादीचं महत्व काय?

• “जागतिक जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत मानवी जीवनासाठी महत्वाच्या असलेल्या पाणथळ जागांचे आंतरराष्ट्रीय जाळे विकसित करणे तसेच त्याची निगा राखणे हा रामसर यादीचा उद्देश आहे.
• यामाध्यमातून संबंधित घटक, प्रक्रीया आणि त्याचे लाभ यांची काळजी घेतली जाते.
• जागांमुळे अन्न, पाणी, तंतुमय पदार्थ, भूजल पुनर्भरण, जलशुद्धीकरण, पूर नियंत्रण, धूप नियंत्रण आणि हवामान नियमन यासारख्या महत्त्वपूर्ण संसाधने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक सेवांचे लाभ मिळतात.
• खरं तर, ते पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत.
• आपल्याला ताज्या स्वच्छ पाण्याचा मुख्य पुरवठा जागेतून होतो.
• पावसाचे पाणी ती शोषून घेते आणि भूजल पुनर्भरणाला मदत करते.

 

हरियाणातील सर्वात मोठी मानवनिर्मित गोड्या पाण्याची पाणथळ जागा

• भिंडवास वन्यजीव अभयारण्य, ही हरियाणातील सर्वात मोठी मानवनिर्मित गोड्या पाण्याची पाणथळ जागा आहे.
• २५० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती वर्षभर अभयारण्यात विश्रांती आणि भटकंती करतात.
• लुप्तप्राय होत असलेल्या इजिप्शियन गिधाड, स्टेप्पी गरुड, पल्लास फिश गरुड आणि ब्लॅक-बेलीड टर्नसह जागतिक स्तरावर दुर्मिळ असलेल्या दहापेक्षा जास्त प्रजाती इथे आढळतात.

 

PM Shri @narendramodi ji’s concern for the environment has led to overall improvement in how India cares for its wetlands. Happy to inform that four more Indian wetlands have got Ramsar recognition as wetlands of international importance. pic.twitter.com/HJayFUZDpl

— Bhupender Yadav (@byadavbjp) August 13, 2021

रामसर जागांमुळे लुप्तप्राय जातींनाही संरक्षण

• हरियाणातील सुलतानपूर राष्ट्रीय उद्यानात 220 पेक्षा अधिक जलचर, पक्षी यांच्या दुर्मिळ प्रजातींना संरक्षण मिळत आहे.
• यात रहिवासी, हिवाळी स्थलांतरित आणि स्थानिक स्थलांतरित जलचर तसेच पक्ष्यांचा समावेश आहे.
• जागतिक पातळीवर नष्ट होण्याचा गंभीर धोका असलेल्या प्रजातींचा ही यात समावेश आहे.
• प्रामुख्याने पटकन मिळमिसळून जाणाऱ्या लॅपविंग, आणि लुप्तप्राय इजिप्शियन गिधाड, सकर फाल्कन, पॅलास फिश ईगल आणि ब्लॅक-बेलीड टर्न यांचा समावेश आहे.

 

दुर्मिळ प्रजातींचं सवर्धन

• गुजरातमधील थोल तलाव वन्यजीव अभयारण्य, पक्षांसाठी मध्य आशियाई उड्डाण मार्गावर आहे.
• इथे 320 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. इथल्या पाणथळ परिसरात 30 पेक्षा जास्त धोक्यात असलेल्या जलचर पक्षांच्या प्रजाती आढळतात.
• यात व्हाईट-रम्प्ड गिधाड, लॅपविंग, आणि असुरक्षित सारस क्रेन, कॉमन पोचार्ड आणि लेसर व्हाईट-फ्रंटेड हंस अशा दुर्मिळ प्रजाती आहेत.

ramsar wetland

पक्षीजीवनासाठी आंतरराष्ट्रीय ठिकाण

• गुजरातमधील वाधवाना पाणथळ ठिकाण पक्षीजीवनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्त्वाचे ठिकाण आहे.
• इथे हिवाळ्यात स्थलांतरित जलपक्षी आश्रयाला येतात.
• यामधे मध्य आशीयाई उड्डाण मार्गावरुन स्थलांतरित होणाऱ्या ८० पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश आहे.
• त्यात पल्लास फिश-ईगल, असुरक्षित कॉमन पोचर्ड, डाल्मेटियन पेलिकन, ग्रे-हेडेड फिश-ईगल आणि फेरुगिनस डक अशा नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचा समावेश आहे.

 

या पाणथळ जागांचा योग्य उपयोग व्हावा याची खातरजमा करण्यासाठी राज्य पापणथळ प्राधीकरणांबरोबर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय मिळून काम करत आहे.


Tags: bhupendra yadavIndian wetlandsNarendra modiRamsarपाणथळ ठिकाणभारत
Previous Post

इंधन महागाईपासून स्वातंत्र्य! स्वातंत्र्यदिनी ओलाची ई-स्कूटर लाँच!

Next Post

स्मार्टफोनचा कॅमेरा वापरा…बना स्मार्ट फोटोग्राफर! ‘या’ सूचना नक्की वाचा…

Next Post
photo

स्मार्टफोनचा कॅमेरा वापरा...बना स्मार्ट फोटोग्राफर! 'या' सूचना नक्की वाचा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!