मुक्तपीठ टीम
भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. फोर्ड मोटरने दिलेल्या माहितीनुसार ते निर्यातीसाठी भारतात इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचा विचार करत आहेत. फोर्ड ही वाहनं भविष्यात भारतीय बाजारातही विकू शकते. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकन कार कंपनी फोर्डने भारतात कारची विक्री आणि उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतातील त्यांच्या कामगारांवर तसंच सप्लायर्सवर संकट कोसळलं होतं. आता फोर्डनं काही प्रमाणात जरी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती सुरु केली तर फायदा होईल.
भारतातील एका प्लांटमध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीची शक्यता
- फोर्ड मोटरने क्लीन इंधन वाहनांसाठी ३.५ अब्ज डॉलर्सच्या योजनेअंतर्गत इनसेंटिव्ससाठी अर्ज केला होता.
- फोर्डच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळाली आहे.
- फोर्डचे भारतात दोन कार प्लांट आहेत.
- फोर्ड भारतातील त्यांच्या एका प्लांटचा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी निर्यात आधार म्हणून वापर करण्याचा विचार करत आहे.
फोर्ड भारतातही ई-वाहनं विकणार?
- फोर्ड भारतात निर्मिती करण्याची शक्यता असलेली ई-वाहनं निर्यातीसाठी असतील, असं सध्या सांगितले जात आहे.
- ही ई-वाहनं भारतातही विकली जातील का, यावर स्पष्टता नाही.
- मात्र, भारतातही ई-वाहनं विकण्याचा फोर्डची भविष्यकालीन योजना असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- टेस्लासारख्या प्रकल्पांच्या बाबतीत मेड इन इंडियाच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेणारे भारत सरकार मेड इन इंडिया फोर्ड ई-वाहनांच्या बाबतीत स्वागताची भूमिका घेणं शक्य आहे.
- खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांवर नोकरीची संधी
पाहा व्हिडीओ: