मुक्तपीठ टीम
सध्या पावसाळा म्हटलं की सुखद कमी आणि दु:खद बातम्याच जास्त कळत आहेत. पूर, दरड कोसळणं आता नित्याचंच होऊ लागलंय. नैसर्गिक आपत्तीत सामान्य भरडले जातातच पण त्यांच्या बचावासाठी जाणारे पोलीस, अग्निशमन, एनडीआरएफ जवान, कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याकडून आपत्तींनंतर डोळ्यांच्या तक्रारी ऐकू येतात. त्यामुळे या वर्गानं महापुराच्यावेळी काय काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेला सल्ला सर्वांनी पालन करावा असाच.
१. महापूर, पावसाचं पाणी, कशी घ्याल डोळ्यांची काळजी?
गेल्या काही दिवसांपासून दरडी कोसळणं, पूरपरिस्थिती पाहता डोळ्यांची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपल्या डोळ्यात जे पाणी जातं ते गढूळ असतं, घाण पाणी असतं. गढूळ पाणी डोळ्यात गेल्यास स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत ते महत्वाचं आहे. डोळ्याच्या आजूबाजूचा भागही धुवून घ्य़ावा. जेणेकरुन डोळ्यातली घाण निघून जाईल.
२. आपत्तीत दु:खातही घ्या डोळ्यांची काळजी
नातेवाईकांचा मृत्यू झाल्यास आपण रडतो. त्यामुळे डोळे कोरडे होतात. अशावेळी जवळच्या लोकांनी डोळे थंड पाण्याने धुवावेत. तसंच अपघातात डोळ्य़ाला इजा झाल्यास डोळ्यांमागच्या नसेवर परिणाम होतो. त्याचवेळी लक्ष दिलं नाही, इंजेक्शन घेतलं नाही तर ५-६ दिवसांनी त्यावर उपाय करता येत नाहीत. जे उपाय त्याचवेळी केले पाहिजेत. उशिरा उपचार झाल्यास अंधत्व येऊ शकतं. त्यामुळे या परिस्थितीत डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवून उपचार करावेत.
३. महापुरात पत्रकार, पोलीस, अग्निशमन, एनडीआरएफ जवान यांनी काय काळजी घ्यावी?
पुरात जाणाऱ्या NDRF च्या जवानांना डोळ्यात पाणी जाऊ नये, यासाठी चष्मा दिलेला आहे. त्यांनी तो लावला पाहिजे. इतरांनीही पोहोतानाचा चष्मा वापरावा, जेणेकरुन डोळ्यात पाणी जाणार नाही. पणं तसं केलं नाही तर डोळे लाल होऊ शकतात, त्यामुळे डोळे थंड पाण्याने धुवा आणि खूपच लाल झाले तर त्यात अँटीबायोटिक्स टाकणं गरजेचं असतं. अशावेळी आपल्या डोळ्यात केमिकल कन्जेन्टुयुविटीस जाऊन डोळ्य़ाला सूज येऊ शकते, ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे आपल्याकडे ऍलर्जी ड्रॉप असतात. Olopack eyedrops हे डोळ्यात टाकावं. त्याचबरोबर artificial tears असतात, त्यात just tears, refresh tears आहेत. अशाप्रकारचे tears ड्रॉप डोळ्यात टाकावेत, म्हणजे डोळ्यातली घाण निघून जाईल. त्यात पुराच्या पाण्यात जणाऱ्यांनी artificial tears ड्रॉप खिशात ठेवूनच जावं. आपलं काम संपलं की ते डोळ्य़ात टाका. ज्यामुळे डोळ्य़ातली घाण निघून जाईल आणि डोळे चांगले राहतील.
४. डॉ. लहानेंचा डॉक्टरांना काय सल्ला?
जनरल फिजिशियनला हेच सांगणं आहे की डोळ्याला किंवा मेंदूला मार लागल्यास जी नस असते तिला aptic nod म्हणतात ती डॅमेज झाल्यास पुढे दिसत नाही म्हणून फिजिशियनला विनंती आहे की, तुम्ही अशा वेळी जीव वाचवण्याचा प्रयत्न करता मात्र पुढे अंधत्वाला सामोरं जावं लागतं हे होऊ नये म्हणून दोन्हींवर उपचार एकाच वेळी सुरु कराव्यात. आणि डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवावं. योग्यवेळी उपचार केल्यास जीवही वाचेल आणि दृष्टीही वाचेल. दोन्हींकडे लक्ष देण्याची गरज आहे.