लठ्ठपणाने वैतागलेल्यांसाठी आता आनंदाची बातमी अमेरिकन शास्त्रज्ञांनी लठ्ठपणा कमी करणारे वायरलेस डिव्हाइस तयार केले आहे. हे डिव्हाइस भूकेची जाणीव होण्यापासून थांबवणार आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करणार. १ सेंटीमीटर आकाराचे हे डिव्हाइस अमेरिकेतील टेक्सासच्या ए अँड एम युनिव्हर्सिटीने बनविले आहे.
हे डिव्हाइस इंप्लांट करण्यासाठी शरीरात एक छोटाशी चीर दिली जाते, असे डॉ. संगू पार्क म्हणतात. शरीरात टाकल्यानंतर हे डिव्हाइस रेडिओ फ्रिक्वेन्सी रिमोटद्वारे बाहेरून नियंत्रित केले जाते.
या डिव्हाइसमध्ये स्थापित मायक्रोचिप आणि एलईडी लाइट मज्जातंतूत सोडते ज्यामुळे याचा परिणाम भूकेवर होतो आणि भूक लागत नाही. अशाप्रकारे लठ्ठपणावर नियंत्रण केले जाते.
शास्त्रज्ञांच्या मते जे लोक आहार आणि व्यायाम करूनही वजन कमी करू शकत नाहीत. ज्यांना गॅस्ट्रिक, बायपासची शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते. त्यांच्या पोटात हे डिव्हाइस इंप्लांट केले जाते. जे पचन तंत्रावर नियंत्रण ठेवते. या शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीसाठी बराच वेळ लागतो.
प्रो. पार्क म्हणतात की, मेंदूद्वारे नियंत्रित होणाऱ्या न्यूरॉनला डिव्हाइसद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. आतापर्यंत, कोणतेही डिव्हाइस तयार केलेले नव्हते जे मेंदू व्यतिरिक्त न्यूरॉन नियंत्रित करू शकेल. हे असे पहिले वायरलेस डिव्हाइस आहे.