Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिन संचलन यावेळी प्रथमच अर्धा तास उशिरा!

January 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
republic day parade

मुक्तपीठ टीम

येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीच्या राजपथावर संचलन आयोजित करण्यात येणार आहे. मात्र यंदा हे संचलन अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे. देशाच्या ७५ वर्षात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाचे संचलन उशिरा सुरु होणार आहे. कोरोना सुरक्षा नियम आणि श्रद्धांजली सभेमुळे यंदाची प्रजासत्ताक दिनाचे संचलन उशिरा सुरू होणार आहे.

 

प्रथमच प्रजासत्ताक संचलन उशिरा…

  • नवी दिल्ली जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रजासत्ताक दिनाचे संचलन अर्धा तास उशिराने सुरू होईल.
  • दरवर्षी सकाळी १० वाजता संचलन सुरू व्हायचे, मात्र यावेळी ते १०.३० वाजता सुरू होणार आहे.
  • हे संचलन रायसीना हिल येथून सुरू होणार असून राजपथ, इंडिया गेट करुन लाल किल्ल्यावर संपणार आहे.
  • यावेळी कोरोना प्रोटोकॉल आणि श्रद्धांजली सभेमुळे संचलन उशिरा सुरू होईल.
  • सध्या सुरू असलेल्या संचलनाच्या सरावात कोरोना प्रोटोकॉल पाळले जात आहे.
  • चित्ररथ आणि पथकांमध्ये सहभागी असलेले जवान आणि कलाकार कोणाला भेटायला जात नाहीत किंवा त्यांच्या जवळही कोणालाही जाऊ दिले जात नाही.
  • ते बसमध्ये चढतात आणि सरावात सामील झाल्यानंतर बसमधून निघतात.
  • याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांना इंडिया गेटवर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
  • त्यामुळे संचलनाला उशीर होणार आहे.

 

राजपथावर सुरक्षा कडक करण्यात आली…

  • दुसरीकडे गाझीपूर फूलमंडीमध्ये आयईडी सापडल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक खबरदारी घेत आहेत.
  • दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन राजपथ आणि संचलन मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
  • संचलन मार्ग आणि राजपथावर आदी ठिकाणी बॉम्ब निकामी पथकाकडून दिवसातून दोनदा तपासणी केली जात आहे.
  • रात्रीच्या वेळीही राजपथावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • दिल्ली पोलिसांनी राजपथावरील सुरक्षा वाढवली आहे.
  • जवळपास ३०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आली आहे.
  • लोकांचे चेहरे ओळखण्यासाठी वेगळी सिस्टम लावण्यात आली आहे.

 

गुप्तचर विभाग आणि लष्कराचं खास लक्ष

  • प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गुप्तचर विभाग (IB) आणि लष्कर, दिल्ली पोलिसांसह सोमवारी राजपथवर पोहोचले.
  • सुरक्षा व्यवस्थेचा अनेक स्तरांमधून, सर्व अंगांनी विचार केला जात आहे.
  • सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी देशाच्या गुप्तचर विभाग आणि लष्कराने दिल्ली पोलिसांना काही सूचना दिल्या आहेत.
  • विशेष म्हणजे २९ डिसेंबरपासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
  • मात्र यावेळी गाझीपूर फूलमंडीमध्ये आयईडी सापडल्याने १५ जानेवारीपासून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Tags: IBrepublic dayRepublic Day Paradeगाझीपूर फूलमंडीप्रजासत्ताक दिनसंचलन
Previous Post

गल्लीतील ‘नाना’भाषेची दिल्लीतही दखल, गडकरीही संतापले, भाजपाकडून देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी!

Next Post

“नाना पटोले, ‘त्या’ गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा”

Next Post
माधव भांडारी

"नाना पटोले, 'त्या' गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!