Friday, May 16, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

३४७ वर्षांपूर्वीच्या वरळी किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातील जीर्णोद्धाराचा शुभारंभ

May 28, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Worli Fort

मुक्तपीठ टीम

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा ऐतिहासिक ठेवा व सांस्कृतिक वैभव असणा-या आणि तब्बल ३४७ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे माननीय पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होत. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाद्वारे पहिल्या टप्प्यातील जिर्णोद्धार कामांचे भूमिपूजन आमदार सुनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर व हेमांगी वरळीकर, जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे व मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाद्वारे वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार व सभोवतालच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. टप्पेनिहाय करण्यात येणाऱ्या या कार्यांतर्गत पहिल्या टप्प्यात करण्यात येणा-या बाबींची मुद्देनिहाय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे.

  • महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारितील किल्ल्यांपैकी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये वरळी किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. उपलब्ध माहितीनुसार सदर किल्ला इसवी सन १६७५ मध्ये बांधण्यात आला.
  • वरळी किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्यावरील पोर्तुगीजकालीन बांधकाम वैशिष्ट्ये आजही दिमाखात उभे आहेत. याच वरळी किल्ल्याच्या जिर्णोद्धाराचे व सभोवतालच्या परिसराच्या सुशोभिकरणाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात आले आहे.
  • वरीलनुसार पहिल्या टप्प्यामध्ये वरळी किल्ल्याच्या जिर्णोद्धाराचे काम लवकरच सुरु करण्यात येत आहे. या कामाकरिता महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, नागरी नियोजन सल्लागार मे. GSA तसेच पुरातन वास्तू जतन सल्लागार विकास दिलावरी यांचे सहकार्य लाभले आहे.
  • वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार, सभोवतालच्या परिसराचे सुशोभिकरण आणि परिसरामध्ये आकर्षक प्रकाशझोत प्रणाली बसविणे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वास्तु संचालनालयाच्या मा. संचालक यांचे ‘ना हरकत’ पत्र यापूर्वीच प्राप्त झाले आहे.
  • वरळी किल्ल्याच्या जिर्णोद्धारांतर्गत प्रामुख्याने स्थापत्य स्वरुपाची कामे करण्यात येणार असून तटबंदीची डागाडुजी देखील करण्यात येणार आहे.
  • वरळी किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस व दक्षिणेकडील बाजूस समुद्र किनारी असलेल्या मोकळ्या जागेत सुरु, समुद्रफुल इत्यादी झाडांची आकर्षक लागवड करण्यात येणार आहे.
  • तसेच किल्ल्याबाहेरील मोकळ्या जागेत हिरवळ व इतर शोभेची झाडे लावून बेसॉल्ट दगडाच्या पायवाटा देखील तयार करण्यात येणार आहेत.
  • वरील व्यतिरिक्त वरळी किल्ल्याची महती आणि माहिती सांगणारे फलक, दिशादर्शक फलक इत्यादी देखील परिसरात जागोजागी बसविण्यात येणार आहेत.
  • वरळी किल्ल्यालगत विद्युतीकरण व प्रकाशझोत योजना तात्पुरती कार्यान्वित करण्यात आलेली असून, ही प्रकाशझोत व्यवस्था कायमस्वरुपी कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.

 


Tags: good newsGovernment of MaharashtraGreater Mumbai Municipal CorporationMLA Sunil ShindemuktpeethMumbai Suburban Guardian Minister Aditya ThackerayRestoration WorkWorli Fortआमदार सुनिल शिंदेचांगली बातमीजिर्णोद्धार कामबृहन्मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र शासनमुक्तपीठमुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरेवरळी किल्ला
Previous Post

आयआयटीच्या प्रवेश परीक्षा आता २५ देशांमध्ये होणार!

Next Post

राज्यातील पहिली शासकीय नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल

Next Post
Neonatal Ambulance

राज्यातील पहिली शासकीय नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!