Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यातील पहिली शासकीय नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल

May 28, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Neonatal Ambulance

मुक्तपीठ टीम

आदिवासी भागातील बाल मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने नवजात शिशुंना संदर्भसेवा देताना अद्यावत आरोग्य सुविधा पुरविणारी आरोग्य विभागाची राज्यातील पहिली नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल झाली आहे. या रूग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज मुंबईत झाले.

सर्व साधनसामुग्री, अद्यावत उपकरणे आणि सुविधांनी सज्ज असलेली रूग्णवाहिका राज्यातील आदिवासी भागातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव, अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा आणि नाशिक जिल्ह्यातील पेठ या आदिवासी भागातील शासकीय रुग्णालयांत दाखल होणार आहेत.

 

राज्यातली पहिली नवजात शिशु रूग्णवाहिका आज सेवेत दाखल झाली आहे. आदिवासी भागातील बाल मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने नवजात शिशुंना अद्यावत आरोग्य सुविधा पुरविणारी आरोग्य विभागाची राज्यातली पहिल्या नवजात शिशु रूग्णवाहिकेचे लोकार्पण माझ्या हस्ते आज मुंबईत झाले. pic.twitter.com/H1zdzLyfid

— Rajesh Tope (@rajeshtope11) May 26, 2022

रुग्णवाहिकेचे फायदे

रुग्णवाहिकेमार्फत नवजात बालकांना संदर्भसेवा देत असताना योग्‍य उपचार सुरु ठेवून इतर आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित करेपर्यंत शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल. कमी वजनाची, कमी दिवसाची बालके, नवजात शिशुंमधील श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार, सेप्सीस, न्यूमोनिया, जलशुष्कता, हायपोथर्मिया, जंतूसंसर्ग यासारख्या गंभीर आजारांच्‍या रुग्‍णांना संदर्भीत करताना याचा उपयोग होणार असून त्‍यामुळे मृत्यु टाळण्यासाठी मदत होणार आहे.

नवजात शिशुला संदर्भ सेवा देताना कांगारु मदर केअर (केएमसी) या सारख्या उपचार पद्धतीचा उपयोग करुन शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल.

नवजात शिशु रुग्णवाहिकेमध्ये Transport Baby Warmer/ Kangaroo Bag उपलब्ध असल्याने Hypothermia मुळे होणाऱ्या अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

नवजात शिशु रुग्णवाहिकेमध्ये Suction Machine, AMBU Bag, Oxygen Hood, Cylinder, Continuous Positive Airway Pressure (CPAP) यासाखी यंत्रसामग्री व उपकरणे, औषधसाठा व प्रक्षिशीत मनुष्यबळ असल्याने संदर्भीत होताना होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

कार्यपद्धती

  • या नवजात शिशु रुग्णवाहिका आदिवासी जिल्ह्यातील तालुक्याच्या उप जिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी कार्यरत असतील.
  • सद्यस्थितीत जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा यासाठी वापर करण्यात येईल. तसेच या नवजात शिशु रुग्‍णवाहिकेसाठी २०२२-२३ मध्ये १५ वैद्यकीय अधिकारी व १० वाहन चालकांच्या पदाची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आलेली आहे.
  • नवजात शिशुंसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व वाहन चालकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
  • तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्षेत्रामधून कॉल आल्यास नवजात शिशु रुग्णवाहिकेमार्फत संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याकरिता १०२/१०८ या टोल फ्री नंबरचा उपयोग करण्यात येईल.

Tags: Child mortalitygood newsGovernment Ambulancehealth facilitiesHealth Minister Rajesh TopemuktpeethNeonatal AmbulanceTribal Departmentआदिवासी विभागआरोग्य मंत्री राजेश टोपेआरोग्य सुविधाचांगली बातमीनवजात शिशु रूग्णवाहिकाबाल मृत्यूमुक्तपीठशासकीय रूग्णवाहिका
Previous Post

३४७ वर्षांपूर्वीच्या वरळी किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातील जीर्णोद्धाराचा शुभारंभ

Next Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी १० जूनपर्यंत अर्जाची मुदत

Next Post
Handloom and Textile Technology

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी १० जूनपर्यंत अर्जाची मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!