मुक्तपीठ टीम
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांनी वारजे पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात पहिली तक्रार केली आहे. गिरिश कुबेर लिखित ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीची बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल ही तक्रार करण्यात आली आहे.
महेश पवळे यांची तक्रार काय ?
- नामवंत इतिहासकारांनी खोटी माहिती खोडून काढीत संभाजी महाराजांचा सत्य जाज्वल्य इतिहास जगासमोर आणला हे सर्वश्रुत आहे.
- संभाजी महाराजांबद्दल अस्सल ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध असताना गिरीश कुबेर यांनी खोटी माहिती आपल्या ग्रंथात समाविष्ट का केली? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
- महापुरुषांविषयी खोटी माहिती देणे समाजात असंतोष निर्माण करू शकते हे एका जेष्ठ पत्रकाराला का समजू नये? की त्यांनी ते जाणीवपूर्वक केले आहे?
- याबाबत सखोल तपास होण्याकरीता लेखक गिरीश कुबेर व पुस्तकाचे प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महेश पवळे यांनी केली आहे.