मुक्तपीठ टीम
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने मंगळवारी खगोलशास्त्राच्या नवीन युगाची सुरुवात केली. ब्रह्मांडातील प्रतिमांची नवीन लहर सोडण्यास सुरुवात केली. सोमवारी नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी सुरुवातीच्या काळातील एक चित्र दाखवले आहे. “ब्रह्मांड”चे आजपर्यंतचे ते सर्वात स्पष्ट चित्र आहे. हे नवे चित्र १३ अब्ज वर्षांपूर्वींचे आहे. हे चित्र बिग बँगच्या ८०० दशलक्ष वर्षांनंतरचे आहे. यापैकी एका नवीन चित्रात दूरच्या वायू ग्रहाच्या वातावरणात पाण्याची वाफ दिसून आली. या चित्रांविषयी माहिती देताना बिल नेल्सन म्हणाले, “प्रत्येक चित्र हा एक नवीन शोध आहे, यातील प्रत्येक चित्र मानवतेला त्यांनी यापूर्वी कधीही न पाहिलेले विश्वाचे चित्र दाखवेल.”
ही छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर, नासाने सांगितले की हे आतापर्यंतचे सर्वात दूरचे, सर्वात तपशीलवार चित्र आहे, ज्यामध्ये तुम्हाला आकाशगंगा देखील पाहता येईल. त्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी अब्जावधी वर्षे लागतात. पृथ्वीपासून सुमारे १,१५० प्रकाश-वर्षे दूर, WASP-96 b हे गुरूच्या वस्तुमानाच्या अर्धे आहे आणि केवळ ३.४ दिवसांत त्याच्या ताऱ्याला प्रदक्षिणा घालते.
अमेरिका महान गोष्टी करू शकते – जो बायडन
- या चित्राचे वर्णन करताना नासाचे प्रमुख बिल नेल्सन म्हणाले की, “हे चित्र SMAC 0723 या ४.६ अब्ज वर्ष जुन्या तारा समूहाचे आहे.
- या तार्यांचे वस्तुमान गुरुत्वाकर्षणाच्या भिंगासारखे कार्य करते आणि आकाशगंगेतून येणारा प्रकाश परावर्तित करते.”
- ही छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर जो बिडेन यांनी “अमेरिका महान गोष्टी करू शकते आणि काहीही आमच्या आवाक्याबाहेर नाही.
- विश्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल” असे त्यांचे विधान आहे.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हे सर्वात शक्तिशाली
- यावेळी ३० वर्षे जुन्या हबल दुर्बिणीऐवजी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करण्यात आला आहे.
- पूर्वीपेक्षा ही १०० पट अधिक शक्तिशाली दुर्बिण आहे.
- जास्त प्रकाश शोषून घेण्याच्या क्षमतेमुळे ते दूरवरून चित्रे काढू शकते.
- या दुर्बिणीने काढलेली ५ छायाचित्रे शास्त्रज्ञांना आधीच माहिती होती.
९ अब्ज डॉलर्सची दुर्बीण
- जेम्स वेब टेलिस्कोप तयार करण्यासाठी ९ अब्ज डॉलर्स खर्च झाले आहेत.
- ही दुर्बीण आतापर्यंत अंतराळात पाठवलेली सर्वात शक्तिशाली दुर्बिणी आहे.
- नॉर्थरोब ग्रुमन कॉर्प नावाच्या कंपनीने ही दुर्बीण बनवली आहे.
- ही कंपनी एरोस्पेस उपकरणे तयार करण्याचे काम करते.