मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर राजधानी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार केली. त्यानुसार दिल्लीच्या मंडावली पोलीस स्थानकात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते आशिष शेलार यांच्यावर शिवसेनेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे शेलारांची परतफेड करण्यासाठी राऊतांवर गुन्हा नोंदवण्यात आला का? अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
- शरद पवार यांना संजय राऊतांनी बसण्यासठी खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
- या फोटोवरून भाजपाच्या काही नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
- त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत अपशब्द वापरले होते.
- त्याविरोधात भाजपा महिला मोर्चाच्या दीप्ती रावत यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
- शरद पवारच काय, तिथे लालकृष्ण अडवाणी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती.
- पवारांचं वय, त्यांना होणारा त्रास या सर्व गोष्टी आहेत.
- आम्ही मांडी घालून बसतो.
- पवारांना वयोमानामुळे तसं बसता येत नाही.
- पायाचा त्रास आहे.
- अशावेळी पितृतुल्य व्यक्तीला खुर्ची दिली तर काय बिघडलं?
- हे जर कुणाला आवडलं नसेल तर ती विकृती आहे.
- अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादवही आले असते आणि त्यांना असा त्रास असता, तर त्यांनाही मी स्वत: खुर्ची दिली असती.
- राजकारणात मतभेद असतील, तरी हे सर्व लोक सार्वजनिक जीवनातील पितृतुल्य आहेत.
- ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर उभेही राहू दिले नाही, त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारू नये.
ही XXगिरी बंद करा…
- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरू आहेत. त्यांनीच मला हा संस्कार दिला आहे.
- यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत.
- प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही.
- ही XXगिरी बंद करा.
- अशाने तुमचं महाराष्ट्रात कधीच राज्य येणार नाही.
- ही विकृती आहे.
- तुमच्या डोक्यातील हा कचरा तुम्ही साफ केला नाही, तर एखाद्या डंपिंगमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील.
- हे तुम्हाला मी आता सांगतो.
- पवारांसारख्या उंचीचे लोकं देशात आहे.
- त्यांना खुर्ची देणं यात काही वावगं नाही.
- हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही.
संजय राऊतांनी ट्वीटद्वारे सांगितला होता xxx चा वेगळा अर्थ!
- संजय राऊतांच्या विधानावर भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती.
- तक्रार झालेल्या XXगिरी शब्दाप्रमाणेच त्यांनी XXX हाही शब्द वापरला होता.
- त्या शब्दाच्या वापराबद्दल संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून Xतिया या शब्दाचा अर्थ समजवण्याचा प्रयत्नही केला होता.